मुंबई: पूर्व उपनगराचा बहुतांश भाग डोंगराने व्यापला आहे. या भागात गेल्या महिनाभरापासून कोरोंना पसरू लागला आहे. वरळी, धारावी पाठोपाठ पूर्व उपनगराला कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाची मोठी दहशत येथील वस्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
डोंगर भागातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा भाग दाटीवाटीचा असल्याने येथे सोशल डिस्टनसिंग नाही. धारावी प्रमाणे या वस्त्यांमध्येही चिंचोळ्या गल्ल्या आहेत. दहा बाय बाराच्या घरात सात ते आठ माणसे रहात आहेत. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा झाला तर घरातील सर्वच व्यक्तीना क्वारंटाईन केले जात आहे. अशी अनेक कुटुंबे सध्या क्वारंटाईन आहेत.
कुर्ला येथील भाभा रुगणालय, गोवंडी येथील शताब्दी रुगणालय, घाटकोपरच्या पश्चिमेस असलेले संत मुक्ताबाई हॉस्पिटल, मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय आदी रुगणालयात प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णाना रुगणालयात जागा नसल्याने आता कोरोनाच्या रुग्णाना घरातच क्वारंटाईन केले जात आहे.
डोंगर भागात अस्वच्छतेमुळे तापाची साथ पसरू लागली आहे. कोरोनासोबत आता तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तापामुळेही मृत्यू होऊ लागले आहेत. नागरिकांच्या स्वॅब टेस्ट होत नाहीत. या टेस्ट झाल्यास रुग्ण झपाट्याने वाढतील असे या भागातील नगरसेवकांना वाटत आहे.
corona enters in east side of mumbai now read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.