मुंबई पुण्यात लॉकडाऊन कालावधी वाढणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...

मुंबई पुण्यात लॉकडाऊन कालावधी वाढणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
Updated on

मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. जगातील अनेक देश लॉकडाऊन आहेत. अनेक देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातल्या मुंबईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

भारतात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केलीये. सर्वांना घरी बसून कंटाळा आलाय. लॉकडाऊन संपणार का, कधी संपणार, वाढणार का? असा प्रश्न सर्वांकडून विचारण्यात येतोय. यावर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत सूचक विधान केलंय. मुंबई पुणे शहरांमध्ये लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात आणखीन काही आठवडे लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो असे संकेत मिळतायत. 

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सध्या सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने सध्या मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलंय. यामध्ये मुंबईतील अनेक परिसर सिल करणं, मुंबईत नवीन आयसोलेशन सेंटर्स तयार करणं, नवीन कोरोना रुग्णालयं बनवणं, आरोग्य विभागाच्या विविध टीम्स तयार करणं, संशयितांना ओळखण्यासाठी आणि क्वारंटाईन नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी वेगळ्या टीम्स तयार कारण असे विविध खबरदारीचे उपाय योजले जातायत.

"लॉकडाऊनमुळं कोरोना संसर्गाचं प्रमाण त्याचसोबत रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे, मात्र आजतरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना दिततोय. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन मागे घेतला जाऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत.एका वेबसाईट ला मुलाखत देताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे विधान केलंय.  

corona lockdown period will be increased see what maharashtra health minister rajesh tope is saying 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.