मुंबई : दुसऱ्या लाटेत (Corona second wave) लॉकडाऊनमध्ये (lockdown unlock) शिथिलता दिल्यानंतर रस्त्यांवर वाहनांची गर्दी (vehicle crowd) वाढली आहे. त्यातच सुरू झालेले कारखाने, कंपन्या (company) यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम हवेवर होतो. अशातच दिलासादायक बाब म्हणजे 'सफर' या संस्थेने संपूर्ण मुंबई (Mumbai city) शहरातील हवेचा दर्जा (air quality) उत्तम नोंदवला आहे.
यातून मुंबईतील हवेचे प्रदूषण ही कमी झाल्याचे समोर येते. अनेक भागात हवेचे प्रदूषण कमी झाले असून समाधानकारक हवेची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी उत्तम हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. मुंबईत संपूर्ण शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी सकाळपासूनच उत्तम नोंदवण्यात आला. भांडूप, कुलाबा, मालाड, माझगांव, बोरीवली , बीकेसी, आणि अंधेरी या परिसरांमध्ये हवा समाधानकारक नोंद करण्यात आली आहे. या सर्व परिसरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक 40 ते 50 दरम्यान नोंदवण्यात आला.
वरळी, चेंबूर, अंधेरी, नवी मुंबई उत्तम
दरम्यान, वरळी, चेंबूर, अंधेरी आणि नवी मुंबईतील परिसरात उत्तम दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 50 नोंद करण्यात आला आहे.
वरळी - पीएम 2.5 उत्तम ऐक्यूआय 028
चेंबूर - पीएम 10 उत्तम ऐक्यूआय 047
अंधेरी - पीएम 10 उत्तम ऐक्यूआय 039
नवी मुंबई - पीएम 10 उत्तम ऐक्यूआय 048
त्यामुळे, मुंबईकरांनी प्रभात फेरी न करण्याचे आवाहन तज्ज्ञ मंडळी करत आहेत. शिवाय, ज्यांना अस्थमा, खोकला किंवा श्वास घेण्यास काही त्रास होत असेल तर त्यावरील उपचार लगेच घ्या असे आवाहन ही करण्यात आले आहे. सध्या मुंबईत ऊन पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या ऊन्हानंतर अचानक पावसाच्या सरी पडतात. यातून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आरोग्याच्या तक्रारीही जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे, कोविड आणि वातावरण बदलाच्या परिणामांतून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करतात.
मुंबई संपूर्ण शहर पीएम 10 उत्तम ऐक्यूआय 050
भांडूप - पीएम 03 समाधानकारक ऐक्यूआय 076
कुलाबा - पीएम 10 समाधानकारक ऐक्यूआय 076
मालाड - पीएम 2.5 समाधानकारक ऐक्यूआय 066
माझगाव - पीएम 2.5 समाधानकारक ऐक्यूआय 061
बोरिवली - पीएम 2.5 समाधानकारक ऐक्यूआय 060
बीकेसी - पीएम 10 समाधानकारक ऐक्यूआय 059
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.