मलेरियानंतर लेप्टोस्पायरोसिसचा वाढता धोका; तीन वाॅर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण

Leptospirosis
Leptospirosissakal media
Updated on

मुंबई : राज्यासह मुंबईतील (corona in Mumbai) कोरोनाच्या संसर्गाचा (corona infection) जोर ओसरला आहे. अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) खाली आला आहे. त्यामुळे, निर्बंध शिथिल करण्यात (unlock) येत आहेत. मात्र, पावसाळी आजारांनी (monsoon decease) डोके वर काढले असून, कोरोना पाठोपाठ या आजारांमुळे चिंता वाढली आहे.मुंबईत सध्या मलेरियाचे (malaria) रुग्ण वाढत आहे. पण, त्यापाठोपाठ आता लेप्टोस्पायरोसिसचे (leptospirosis) रुग्ण वाढत आहेत.

दरम्यान, मुंबईतील तीन वॉर्डमध्ये लेप्टोचे जास्तीत जास्त रुग्ण सापडत आहेत. 15 ऑगस्टपर्यंत लेप्टोच्या 27 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, जानेवारी ते 15 ऑगस्टपर्यंत 123 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण हे ई, एफ उत्तर, आणि के पूर्व वॉर्डमध्ये नोंदले गेले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण नोंदले असून एकूण 2,943 एवढे रुग्ण आहेत. तर, ऑगस्ट महिन्यात 61 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून गेल्या आठ महिन्यांत 138 रुग्ण आढळले असून गॅस्ट्रोचे 1,731 एवढे रुग्ण सापडले आहेत.

Leptospirosis
सिरॉलॉजीक टेस्ट मधून डेल्टा प्लसचे वेगवेगळे व्हेरियंट; आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाईन फ्लूच्या 36 रुग्णांची नोंद

दरम्यान, मुंबईत स्वाईन फ्लूचे 36 रुग्ण आढळले आहेत. तर, 15 ऑगस्टपर्यंत 8 रुग्ण स्वाईन फ्लूचे नोंदले आहेत. हॅपेटायटीस 150 रुग्ण आढळले  आहेत. आकडेवारी पाहता मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक दिसत असले तरी मुंबई महापालिका सर्वच आजारांकडे लक्ष ठेवून आहे. त्यानुसार, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, नागरिकांची विचारपूस, गोळ्यांचे वाटप, साचलेल्या पाण्यांची ठिकाणे आणि उंदराची बिळे नष्ट करण्यात आली आहेत.

घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा. ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे असतील तर उपचारांना उशीर करु नये.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.