कोरोनाच्या डेल्टाप्लस व्हेरिएंटने (Corona delta plus variant)मुंबईत शिरकाव केल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालिकेची दाणादाण उडाली असून पालिका सतर्क (Bmc alert)झाली आहे.
मुंबई : कोरोनाच्या डेल्टाप्लस व्हेरिएंटने (Corona delta plus variant)मुंबईत शिरकाव केल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालिकेची दाणादाण उडाली असून पालिका सतर्क (Bmc alert)झाली आहे. हे डेल्टाप्लस कोरोनाचं नवं रुप असून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकतं. नागरिकांच्या गर्दीत (People mob)या व्हायरसचा संसर्ग वेगाने होऊ शकतो.त्यामुळं या नव्यानं रुप धारण केलेल्या कोरोना व्हेरियंटचा प्रसार होऊ नये याची खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक(corona precautions) उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई पालिकेने पुन्हा लोकांची तपासणी आणि चाचण्या(corona test)वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसर्या लाटेच्या तुलनेत पालिका यावेळी दुप्पट क्षमतेने चाचणी करणार आहे.(Corona new delta plus variant dangerous for people BMC takes more than 50000 corona tests)
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात कोरोना डेल्टाप्लस या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळं सर्व जिल्ह्यांची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पालिकाही हा व्हेरियंट रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसर्या लाटेत कोरोना विषाणूची तीव्रता जास्त होती. मात्र, आता नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार आणि संसर्गाची तीव्रता आणखी जास्त असल्याने त्याला रोखण्यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
त्यामुळे मुंबईत स्क्रिनिंग आणि चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईत दररोज सरासरी 30 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे. दुसर्या लाटेमध्ये चाचण्यांची संख्या 50 हजारांवर गेली. यावेळी पूर्वापेक्षा अधिक चाचण्या घेतल्या जाणार आहे. माणसांची अधिक वर्दळ असलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये आणि निवासी भागात चाचण्या वाढवल्या जाणार आहेत. सध्या मुंबईतील मॉल्स बंद असून पुन्हा सुरू झाल्यास येथेही कोविड चाचण्या घेतल्या जातील. या चाचणीसह दाट लोकसंख्या असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये स्क्रीनिंग आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रोटोकॉल पाळण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. शिवाय, कारवाईचा बडगा देखील उगारला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.