कोरोनाच्या लाटांची बालकांनाही बाधा; पहिल्या लाटेत १९८८, दुसऱ्या लाटेत...

child corona
child coronasakal media
Updated on

ठाणे : पावणेदोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. मात्र शाळा सुरू होऊन तीन दिवस उलटत नाही तोच नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका शाळेत तब्बल १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा (corona infection to children) झाली. त्यामुळे पालकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. शाळेत मुलांना पाठवायचे, की नाही या संभ्रमात सध्या पालक दिसत आहेत. पण गेल्या दोन वर्षांची कोरोना काळातील (corona pandemic) आकडेवारी पाहता दोन्ही लाटांमध्ये बालकांनाही (children's corona infected) फटका बसला आहे. ठाणे पालिका क्षेत्रात (Thane municipal corporation) पहिल्या लाटेत (corona first wave) शून्य ते १० वयोगटातील सुमारे एक हजार ९८८ तर दुसऱ्या लाटेत दोन हजार ६९३ बालकांनी कोरोनाचा सामना केला. आता कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरली असली तरी शाळा सुरू झाल्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

child corona
"ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट"

लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे कोणताही संसर्ग त्यांना पटकन होण्याचा धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हे प्रकर्षाने जाणवले. टाळेबंदी आणि शाळा बंद असल्यामुळे बहुतेक बालके घरी सुरक्षित होती. मात्र पालकांमुळे तर कधी कार्यक्रम, समारंभांमुळे बालकांना कोरोनाने गाठल्याचे दोन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला शून्य ते १० वयोगटातील बालकांमध्ये बाधितांची संख्या इतर रुग्णांच्या तुलनेत कमी होती. तरीही मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सुमारे एक हजार १८८ बालके कोरोना बाधित झाली. या कालावधीत तीन बालकांना आपला जीवही गमवावा लागला. एकूण बाधितांच्या तुलनेत शून्य ते १० वयोगटातील बाधीत २.९ टक्के होते. दुसऱ्या लाटेत ही टक्केवारी ३.३ इतकी वाढली.

मृत्यूदर आटोक्यात आणण्यात यश

१) २२ मार्च २०२१ पर्यंत ठाणे पालिका क्षेत्रामध्ये शून्य ते १० वयोगटातील एक हजार ९८८ बाधित बालकांची नोंद झाली होती. पुढील एका महिन्यात म्हणजे २५ एप्रिलपर्यंत त्यामध्ये तब्बल एक हजार ५६० बालकांची भर पडून ही संख्या ३ हजार ५४८ पर्यंत गेली. या दरम्यान आणखी एका बालकाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या चार झाली. त्यानंतर २३ मेपर्यंत आणखी ४८५ लहानग्या रुग्णांची भर पडली.

२) कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाही दर महिन्याला सरासरी ५० बालके बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. तरीही दुसऱ्या लाटेत सुमारे दोन हजार ७०० बालके बाधित झाली आहेत. सुदैवाने या कालखंडामध्ये बालकांचा मृत्यूदर आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. पहिल्या लाटेत तीन तर दुसऱ्या लाटेत एका बालकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

child corona
शेतीत यांत्रिकीकरण वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल - राजीव पोद्दार

उत्साहावर विरजन

१) राज्यात दोन महिन्यांपूर्वी इयत्ता आठवी ते १० पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. आठवड्यातून दोन दिवस या विद्यार्थ्यांचे शाळेत वर्ग भरत आहेत. तर उर्वरित दिवसांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. दुसरी लाट ओसरल्याचे लक्षात आल्यानंतर आता १५ डिसेंबरपासून इयत्ता पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही शाळांचे दरवाजे उघडले आहेत.
२) तब्बल पाऊणेदोन वर्षे घरात राहून कंटाळलेले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत जात आहेत. पण या उत्साहावर नवी मुंबईतील प्रकाराने अवघ्या तीन दिवसांत विरजन पडले. या प्रकारामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यात लहान मुले अद्यापि लसीकरणापासून वंचित आहेत. अशात संभाव्य तिसरी लाट आली तर त्याचा सर्वाधिक फटका आपल्या पोटच्या गोळ्याला बसू शकतो, या काळजीत सध्या पालक आहेत.

पहिल्या लाटेतील २३ मार्च २०२१ पर्यंतचे बाधित

वयोगट मुली मुले

०- १० ८८१ ११०७
११- २० १७०९ २२८९

दुसऱ्या लाटेतील १७ डिसेंबर २०२१ पर्यंतचे बाधित
वयोगट मुली मुले
०- १० २११३ ४०३४
११- २० २५६८ ५३५४

१३ बालके सक्रिय

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला शून्य ते १० वयोगटातील १३ सक्रिय बालके आहेत. तर ११ ते २० वयोगटातील २८ मुले सक्रिय आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम असून बहुतेक रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.