मुंबईच्या काही भागात कोरोनाशी युद्ध कायम, ७ दिवसांत २०९९ रुग्ण

corona
corona sakal media
Updated on

मुंबई : मुंबईत पूर्वीच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण (corona patient) कमी झाले असले तरी शहराच्या काही भागात (Mumbai area) अजूनही युद्ध कामय आहे. काही परिसर असे आहेत जिथे एका आठवड्यात 100 पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण (corona new patient) सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या मते, (health department) काही भागात अजूनही कोविड नियमांचे पालन (corona rules) केले जात नाही आणि लॉकडाऊनमध्ये (lockdown) शिथिलता आल्यानंतर रुग्ण वाढत आहेत. (corona patient-Mumbai area-corona new patient-health department-corona rules-lockdown-nss91)

जवळपास एका आठवड्यापासून, कोरोनाचे 400 हून कमी नवीन रुग्ण मुंबईत दररोज सापडत आहेत. तर काही कालावधीपूर्वी शहरात दररोज 9 हजार ते 10 हजार नागरिकांना कोरोनाची लागण होत होती. आता रुग्णांमध्ये घट झाली आहे, असे असूनही असे काही क्षेत्र आहेत जिथून कोरोनाची प्रकरणे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.

corona
मुंबईत एका महिन्यात होम क्वारंटाईनच्या संख्येत 50 टक्के घट

29 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान मुंबईत 2099 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आर दक्षिण, के पश्चिम, डी, टी आणि एच पश्चिम या विभागातून जास्तीत जास्त रुग्ण आढळत आहेत. या सर्व वॉर्डांमध्ये इतर प्रभागांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. रुग्णसंख्या पूर्णपणे शून्यावर येणार नाही, परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, पाळत ठेवण्यावर अधिक भर दिला जात आहे.

या 5 ठिकाणी अधिक रुग्ण

मुंबईत गेल्या 7 दिवसांत कांदिवलीतून जास्तीत जास्त 176 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर अंधेरी पश्चिममध्ये 174, ग्रँट रोडमध्ये 146, मुलुंडमध्ये 114 आणि वांद्रे येथे 112 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. म्हणजेच, 24 वॉर्डांमध्ये आढळलेल्या एकूण 2099 कोरोना रूग्णांपैकी 722 कोरोना रुग्ण केवळ या 5 वॉर्डमध्ये आढळले आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि इतर राज्ये आणि जिल्ह्यांमधून प्रवेश

महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईतील अनेक लोक फिरण्यासाठी आणि कामासाठी इतर राज्यांमध्ये जात आहेत. याशिवाय, अनेक मजूर किंवा लोक घरातील कामांसाठी  नोकरांना परत बोलावत आहेत. आता त्यापैकी काही देखील सकारात्मक असल्याचे दिसून आले. जेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनाही संसर्ग होतो. या कारणांमुळेच रुग्ण सापडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.