मुंबई कोरोनाच्या विळख्यात; चार वॉर्ड्स कोरोना हॉटस्पॉट!

Corona patients
Corona patientssakal media
Updated on

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) आणि ओमिक्रॉनचा (omicron variant) वाढता प्रभाव पाहता मुंबईतील (corona in mumbai) चिंता सध्या वाढली आहे. मुंबईतील 4 वॉर्ड्स कोरोनाचे हॉटस्पॉट (four wards corona hotspot) बनले आहेत. (corona patients increases speedily in mumbai as four wards became corona hotspot)

Corona patients
‘नैना’प्रकल्प रद्द करा अन्यथा आत्‍मदहन करू, शेतकऱ्यांचा इशारा

पश्चिम उपनगरांतील के पश्चिम भागात अंधेरी आणि विलेपार्लेत दुसऱ्या लाटेपासून सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. वांद्रे पश्चिम आणि जी दक्षिण वॉर्डमध्ये कोविड -19 चे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील के पश्चिम, एच पश्चिम, के पूर्व आणि डी या चार वॉर्डात मुंबईतील इतर वॉर्ड्सपैकी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

के पश्चिम विभागात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. हा आलेख 27 डिसेंबरपासून पुन्हा वाढला असून तेव्हापासूनच वॉर्डमध्ये 350 च्या पुढे रुग्णसंख्या झाली. आता 10 दिवसांत ही संख्या वाढून थेट 4 हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यानुसार, बेड्स ही भरण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पण, आयसीयू आणि ऑक्सिजन बेड्सचा वापर अद्याप कमी असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Corona patients
अलिबाग : पर्यटनाला दिलेली सूट महागात, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवर

के पश्चिम पाठोपाठ, एच पश्चिम हा वॉर्डही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. 27 डिसेंबर दरम्यान या वॉर्डात  252 सक्रिय रुग्ण होते. आता ही संख्या वाढून 3744 वर पोहोचली आहे. डी वॉर्डात आतापर्यंत 2558 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, के पूर्व या वॉर्डमध्ये 2606 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या 8 दिवसांपासून दुपटीने रुग्ण आढळू लागले आहेत. सोमवारीही 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबईत 350 ते 500 च्या दरम्यान रुग्ण सापडत होते. दरम्यान, मुंबईच्या बी आणि सी हे दोन वगळता इतर वॉर्डातही 500 ते 1000 च्या वर सक्रिय रुग्ण नोंदले गेले आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले वॉर्ड्स

 पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, सर्वाधिक सक्रिय रुग्ण चार वॉर्डसमध्ये नोंदण्यात आले आहेत.

के पश्चिम -  4564

एच पश्चिम - 3744

डी - 2558

के पूर्व - 2606

एच पूर्व -1762

एफ दक्षिण - 1761

सर्वाधिक मृत्यू झालेले वॉर्ड्स

के पूर्व - 1283

पी दक्षिण - 1051

आर सी 988

पी उत्तर - 976

आर एस - 888

के पश्चिम - 807

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()