गलथान कारभार ! ३० तास रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पाहिली बेडसाठी वाट; मग मिळाले कोरोनाग्रस्त महिलेला उपचार...

गलथान कारभार ! ३० तास रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पाहिली बेडसाठी वाट; मग मिळाले कोरोनाग्रस्त महिलेला उपचार...
Updated on

मुंबई : मुंबईच्या अनेक रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केईएममध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने तब्बल 30 तास उपचारांसाठी वाट बघितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही महिला केईएमच्या पार्किंगमध्ये बसून राहिली होती. एखादी गंभीर व्यक्ती कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल झाली तर बेडसाठी अनेकदा धावाधाव करावी लागते. असं असूनही रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. 

मुंबईत राहणारी 66 वर्षीय महिला मंगळवारी सकाळी कोरोना बाधित झाली. तात्काळ त्यांनी केईएम हॉस्पिटल गाठलं. पण, बेड उपलब्ध नसल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ती केईएम रुग्णालयाच्या पार्किंग लॉटमध्ये तिने तब्बल 30 तास वाट पहिली. 

एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, ही महिला बऱ्याच रुग्णालयांंमध्ये आपल्या मुलासह बेड उपलब्ध असेल या आशेने फिरत होती. मात्र, सेव्हन हिल्स रुग्णालयाने ही बेड्स उपलब्ध नसल्याचे सांगत तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ती महिला केईएममध्ये गेली. मात्र तिथेही बेड्स उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं. शिवाय, बेड उपलब्ध झाला की सांगितलं जाईल असं सांगत आपातकालीन विभागातून पार्किंगमध्य वाट बघण्याचा सल्ला दिला.

ही महिला आणि तिच्या 30 वर्षीय मुलाने रात्रभर बेड साठी केईएम रुग्णालयातच वाट बघितली. रुग्णालयाजवळ असलेली दुकाने ही बंद असल्याकारणाने त्या दोघांना उपाशीपोटी रुग्णालय परिसरात रात्र घालवावी लागली.

सदर महिला हृदय विकाराच्या आजाराने आणि तापाने ग्रस्त होती. असं असताना तिला दाखल करुन घेणं दूरच तिची साधी चौकशी, तपासणी ही केली गेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. एक पूर्ण दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं. 

मुंबईत अशा आतापर्यंत बऱ्याच घटना घडल्या आहेत. वसई भागात राहणारी गर्भवती महिलाही कोव्हिड पॉझिटिव्ह होती. ती देखील अनेक रुग्णालये फिरत राहिली. पण, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असताना मुंबईत रुग्णांना उपचारांसाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याचे ही या घटनेवरुन समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

corona positive case spends 30 hours in car parking before getting medical aid of covid19

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()