मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) मुंबईत नियंत्रित असल्याचे दिसत आहे. गेल्या 6 महिन्यांत जूनमध्ये (Corona Update) कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये कोरोनाचे 15,136 नवीन रुग्ण (Corona New Patient) आढळले आहेत. जर मे महिन्यात सापडलेल्या रुग्णांची तुलना जूनमध्ये आढळलेल्या रुग्णांसोबत केली तर त्यात 72 टक्के घट आढळली आहे. (Corona Second wave Decreasing Compare to may month)
जानेवारीमध्ये कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे नियंत्रणात आली होती. परंतु, फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट मुंबईत पसरली. दुसर्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढली की एकट्या एप्रिल महिन्यातच कोरोनाचे नवीन रुग्ण दोन लाख 29 हजार 172 वर पोहचले. मात्र, आता पालिकेने घेतलेल्या कठोर निर्णर्यांमुळे कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याचे दिसते आहे.
रिकव्हरी दर 96 टक्क्यांवर
जानेवारीत मुंबईतील कोरोना रूग्णांच्या रिकव्हरीचा दर 93 टक्के होता. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर एप्रिलमध्ये हा दर 84 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. महानगरपालिकेच्या उपाययोजनांमुळे मे मध्ये रिकव्हरीचे प्रमाण वाढून 89 टक्के झाले. सध्या रिकव्हरीचा दर 96 टक्के आहे.
दुप्पट दर महिन्यात 263 दिवसांनी वाढला
एप्रिल-मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागली. 1 मे रोजी कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच दुप्पट होण्याचे प्रमाण 96 दिवस होते. 1 जून रोजी मुंबईचा दुप्पट दर 453 दिवस होता, तो 30 जूनला 263 दिवसांवरून 716 दिवसांवर पोहोचला. त्यामुळे, सध्याची परिस्थितीत नियंत्रणात जरी दिसत असली तरी ती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे, लोकांनी कोविड संबंधित सर्व नियम पाळणे आवश्यक आहे असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
महिना रुग्ण
जानेवारी - 15,230
फेब्रुवारी - 17,473
मार्च - 96,590
एप्रिल- 2,29,172
मे- 54,560
जून- 15,136
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.