कोविड काळात वाढली चिंता; 25 टक्के मुंबईकर नैराश्यात

केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्जज्ञांचा अहवाल
Depression
Depressionsakal media
Updated on

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (corona second wave) तडाखा जवळपासळ प्रत्येक घराने अनुभवला. लॉकडाऊन, शारीरीक अंतर राखण्याच्या नियमामुळे (social distance) व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनातही (Lifestyle changes) अनेक बदल घडवावे लागले. प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष आर्थिक आणि सामाजिक परिणाम (social impact) सर्वानाच सोसावे लागत आहेत. अनेकांचे रोजगार गेले (employment), त्यातून आलेली निराशा आणि ढासळळेले मनस्वास्थ्य या सर्वांचा त्रास सध्या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

Depression
मुंबई महापालिकेचे अन्नदान संशयांच्या भाेवऱ्यात; कॉंग्रेसचा आरोप

कोरोना झाला किंवा नाही झाला तरी जगण्यावर त्याचे परिणाम झालेच. दरम्यान, केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, 25 टक्के मुंबईकर नैराश्याच्या छायेत असून 26 टक्के नागरिकांमध्ये चिंतेचे सावट कायम आहे. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारज्ज्ञांनी केलेल्या ऑनलाईन संशोधन अभ्यासात 518 नागरिकांनी प्रतिसाद दिला. यातील 25 टक्के नागरिकांमध्ये नैराश्य आणि 26.2 टक्के नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञांनी ऑनलाईन सर्वे करत ताण, चिंता आणि नैराश्य या तीन घटकांवर आधारित अभ्यास केला.

या संशोधन अभ्यासात ऑनलाईन गुगल फॉर्म देण्यात आला होता. जो मेल  किंवा व्हॉट्सअॅप द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवला गेला. ज्यात एकूण 518 नागरिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, या संशोधनात डास (डीएएसएस 21) यात नैराश्य, चिंता आणि ताण या तीन गोष्टी मोजल्या जातात. डास हे जागतिक पातळीवर नैराश्य, चितेंचे आणि ताणाचे प्रमाण मोजण्याचे एक स्केल आहे.

हे जोखीम घटक आढळले

ज्यांना आधीपासूनच मानसिक आजार होता, ज्या लोकांचा रोजगार गेला, कोविड महामारीमुळे दैनंदिन जीवनशैली बदलली, खूप जास्त टीव्ही चॅनल्स बघत होते या सर्वांचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे या अहवालातून दिसून आले आहे असे केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ आणि या संशोधनात सहभाग घेतलेल्या डॉ. शिल्पा आडारकर यांनी सांगितले आहे.

Depression
दुसऱ्या दिवशीही नफावसुली; सेन्सेक्स 456 अंश घसरला

"पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मानसिक आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहेत. उदासिनता, नैराश्य आणि चिंतेसह राग येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविड आणि लाॅकडाऊनमुळे नैराश्य त्यातुन अंगदुखी, डोकेदुखी असलेले रुग्ण वाढले आहेत. आता नागरिकांना सर्वाधिक जास्त त्रास आर्थिक व्यवहार दृष्टिकोनातुन होत आहे. सध्या पोस्ट ट्राॅमेटिक डिजास्टर जास्त आहे. फ्लॅशबॅक, आणि ज्यांच्या घरी कोविड मुळे मृत्यू झाले आहेत अशांना जास्त त्रास होतो."

- डाॅ. अजिता नायक,मनोविकृती विभाग

प्रमुख, केईएम रुग्णालय

नैराश्य आणि चिंता दूर करण्यासाठी काय कराल ?

नातेवाईक, मित्र मैत्रिणींशी चांगला संपर्क ठेवा

आधार शोधा आणि मदत घेतली पाहिजे, बोलले पाहिजे,

त्याच त्याच गोष्टी करणे टाळा.

अडचणी सोडवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.