मुंबई : मुंबईत तिसऱ्या लाटेत (Mumbai corona third wave)लहान मुलांना सर्वाधिक फटका बसणार असे भाकीत केले जात होते. मात्र, या लाटेतही सर्वाधिक परिणाम ज्येष्ठांवर (seniors)झाला आहे.मुंबईत 1 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत कोविड-19 (Covid-19) मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 89 टक्के लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर 11 टक्के मृत्यू 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात 80 कोविड मृत्यू झाले आहेत, त्यापैकी 71 ज्येष्ठ नागरिक होते, तर उर्वरित 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. त्यामुळे, सध्याच्या आकडेवारीनुसार, शहरातील मृत्यूचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आरोग्य अधिकार्यांनी म्हटले आहे की, यापैकी बहुतेक मृत्यूंमध्ये, खालच्या श्वसनमार्गाचा समावेश होता आणि याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण बहुतेक मृतांना कॉमोरबिडीटी म्हणजेच इतर सहव्याधी होती.पालिकेच्या मृत्यूच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, संपूर्ण कोरोना महामारीच्या साथीत ज्येष्ठ नागरिक हा सर्वात असुरक्षित गट राहिला आहे.राज्य कोविड-19 मृत्यू लेखापरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शहरात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतेकांना कॉमोरबिडीटीज होते किंवा उपचारास उशीर झाला होता. पण, अलीकडील मृत्यूंपैकी 80 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे अंशतः किंवा पूर्ण लसीकरण झालेल्यांपैकी होते.(Mumbai latest news)
“ तिसऱ्या लाटेत अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टला जास्त संसर्ग होतो पण काही रुग्णांमध्ये, फुफ्फुसे गुंतलेले नसतात कारण रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आमच्याकडे अजूनही आयसीयूमध्ये सुमारे 560 लोक आहेत, त्यापैकी काहींना ऑक्सिजनची गरज आहे. त्यांच्यापैकी काहींना श्वसनमार्गाचा संसर्ग कमी आहे, ज्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.सध्या तिसऱ्या लाटेचा संक्रमणाचा टप्पा सुरू आहे, ओमिक्रॉनची तिसरी लाट आहे. डेल्टा अधिक गंभीर आहे हे लक्षात घेता, ज्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे अशा रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल,” असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
“ रुग्णांमध्ये घट झाली असली तरी, कोविड मृत्यू आणि रुग्णालयात दाखल करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, कारण येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील कोविड मृत्यू दोन अंकी येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. जास्त वयोगट आणि कॉमोरबिड परिस्थिती ही ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे घटक आहेत, असे राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी सांगितले.पहिल्या लाटेत, मृत्यू दर 2.59 टक्के होता, 20,36,130 प्रकरणांपैकी 52,835 मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत, महाराष्ट्रात 1.78 टक्के 78,383 कोविड मृत्यू नोंदवले गेले.(Mumbai corona news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.