मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (corona third wave) प्रत्येक जण चिंतेत आहे. कोरोनाचा आलेख कोणत्या दिशेने जाईल हे सांगणे कठीण आहे, परंतु, गेल्या 10 दिवसांपासून मुंबईत दररोज 500 पेक्षा कमी नवीन रुग्ण सापडत (corona new patients) आहेत. त्यातही मुंबईसाठी (Mumbai) दिलासादायी बाब म्हणजे मुंबईतील गंभीर रुग्णांची संख्या दुपटीने कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांपैकी (corona active patients) एकूण 8 टक्के गंभीर रुग्ण आहेत. तर, एकूण रुग्णांपैकी फक्त 1 टक्के गंभीर असल्याची नोंद पालिकेच्या (bmc) डॅशबोर्डवर आहे. मात्र, गेल्या एका महिन्याच्या तुलनेत लक्षण असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
शनिवारी मुंबईत 40911 चाचण्या घेतल्यानंतर 454 कोरोना बाधित आढळले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ होऊनही रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असे असतानाही पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी आणि डॉक्टरांनी लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एका महिन्यापूर्वी 16 टक्के गंभीर रुग्ण होते. तर, मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 49 टक्के लक्षण असलेले रुग्ण आहेत. गेल्या महिन्यात 41 टक्के लक्षण असलेले रुग्ण दाखल झाले होते.
मुंबईत दररोज कोविड 19 चे रुग्ण 500 च्या दरम्यान सापडत आहेत. 4,706 सक्रिय प्रकरणांपैकी 375 म्हणजेच जवळपास 8% रुग्णांची गंभीर परिस्थिती सध्या पालिकेच्या आकडेवारीनुसार आहे. तर, सक्रिय रुग्णांपैकी 43 टक्के रुग्ण लक्षण नसलेले आहेत. 22 ऑगस्ट रोजी मुंबईत गंभीर रूग्णांची संख्या एकूण 444 एवढी होती. तर, 2,825 सक्रिय रुग्ण होते. मात्र, आता सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली असून 4,706 सक्रिय रुग्ण झाले आहेत.
मुंबई आकडेवारी
एकूण चाचणी- 101,77,774
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - 740761
एकूण मृत्यू- 16079
पूर्णपणे बरे - 717521
दुप्पट दर - 1195 दिवस
चाळ / झोपडपट्टी सील - 1
बिल्डिंग सील- 53
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.