मुंबई : कोरोनाच्या (corona) संकटाशी भारताची लढाई अजून सुरूच आहे, त्यातच आता तिसऱ्या लाटेची (corona third wave) शक्यताही वर्तवली जात आहे. अशा काळामध्ये ज्या रुग्णांची (patients) स्थिती फारशी बिकट नाही, मात्र त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल (hospitalized) होण्याची गरज आहे, अशांसाठी कुटुंबियांच्या मदतीने घरच्याघरीच वापरता येतील अशा काही उपचारपद्धतींची (home treatments) शिफारस वैद्यकीय तज्ज्ञांकडून (doctors) केली जात आहे. दरम्यान, शरिरातील ऑक्सिजन (oxygen) कमी झाल्यास पालथे झोपण्याचा सल्ला राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या (corona task force) सदस्यांनी सल्ला दिला आहे.
एखाद्या रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीमध्ये (एसपीओ2) चढउतार होताना दिसल्यास रुग्णालय बेडची सोय होईपर्यंत रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी ही पद्धत वापरण्याचा सल्ला दिला जातो. श्वसनयंत्रणेशी निगडित समस्यांचा यशस्वीरित्या सामना करण्यासाठी तसेच श्वासोच्छवास आणि त्यायोगे ऑक्सिजन जनरेशनच्या प्रक्रियेमध्ये तात्पुरती सुधारणा घडवून आणण्यासाठी ही पद्धत कामी येते असे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी सांगितले.
लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीन जर्नलच्या मते, प्रोनिंगमुळे कोव्हिड-19 च्या रुग्णांना भासणारी कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते. ऑक्सिजनची गरज असलेल्या मात्र कृत्रिमरित्या ऑक्सिजन सुरू न केलेल्या कोव्हिड-19 च्या रुग्णांना आयसीयू यंत्रणेमध्ये जागेपणी प्रोन पोझिशनिंगमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो..
प्रोनिंग म्हणजे काय?
प्रोनिंग ही वैद्यकीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे, ज्यात रुग्णाला अतिशय नेमक्या, सुसंगत आणि सुरक्षित हालचालींद्वारे पाठीवरून पोटावर झोपवले जाते, जेणेकरून ती व्यक्ती पालथी व्हावी. श्वसनक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रवहन सुलभतेने व्हावे यासाठी हे केले जाते. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याचे दिसून आल्यास (घरी ऑक्सिमीटरवर मोजताना) रुग्णाने अधिक चांगल्या व्हेंटिलेशनसाठी आणि श्वासोच्छवास सुलभ होण्यासाठी पालथे झोपावे. शिवाय, यातून मृत्यूची संभाव्यताही कमी होते.
प्रोनिंगचा फायदा -
व्हेंटिलेशन/पर्फ्युजन मॅचिंग प्रक्रियेमध्ये सुधारणा (रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणे आणि कार्बनडाय ऑक्साइड काढून टाकला जाण्याची क्रिया सातत्याने होत राहण्यासाठी आवश्यक प्रक्रिया) मृत्यूची संभाव्यता कमी होते.
प्रोनिंगदरम्यान येणा-या दाबामुळे त्वचा किंवा इतर मऊ उतींना इजा होऊ शकते. त्यामुळे ही क्रिया काटेकोर देखरेखीखालीच व्हायला हवी. शरीराला सोसवेल तोवरच प्रोनिंगच्या स्थितीत रहावे. एखाद्या रुग्णाच्या पाठीचा कणा हलला असल्यास, पेल्व्हिक क्षेत्र किंवा कण्याला फ्रॅक्चर झाले असल्यास, गर्भावस्थेमध्ये, डीप व्हेन थ्रॉम्बोसिसची समस्या असल्यास त्यावर उपचार घेऊन 48 तासांहून कमी काळ उलटला असल्यास), हृदयाच्या गंभीर समस्या असल्यास प्रोनिंग करण्यास मनाई केली जाते. प्रोनिंग करणे शक्य नसेल तर अशी व्यक्ती ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी आपल्या उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.