दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाचा विळखा; 'ब्रेक थ्रू संसर्ग' काय आहे ?

सात हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण
corona positive even after taking two dose of vaccination
corona positive even after taking two dose of vaccination sakal media
Updated on

मुंबई : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या (corona two dose) डाॅक्टरांना कोरोनाची तिसर्‍या वेळेस लागण झाल्यानंतर कोरोना लसीच्या कार्यक्षमतेवर (corona vaccination) प्रश्नचिन्ह (doubt) उपस्थित झाले होते. मात्र, आता पालिकेकडून (bmc) मिळलेल्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai) कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 0.34 टक्के लोकांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या 7 हजार 057 नागरिकांना कोविडची बाधा झाली आहे. अशा केसेसना ब्रेक थ्रू संसर्ग असेही म्हणतात.

corona positive even after taking two dose of vaccination
गणेशोत्सव मंडळांपुढे परवानगीचे विघ्न ? महापालिका आयुक्तांना पत्र

पालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोविडसह इतर कोणत्याही व्हायरसपासून कोणतीच लस 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. पण, लसही आजाराच्या संसर्गाची तीव्रता कमी करते. ज्यामुळे गंभीर आणि रुग्णालयात दाखल होण्याची किंवा आयसीयूची गरज पडत नाही . पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही डोस घेणाऱ्या 24 लाखांपैकी फक्त 0.34 टक्के लोकांना कोरोनाचा त्रास झाला आहे. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते.  किती जणांना दाखल करावं लागलं किंवा होम आयसोलेशन किंवा आयसीयूची गरज पडली याचा अभ्यास केला जात आहे. शिवाय, त्यांना त्या लक्षणांनुसार उपचार दिले गेले आहेत. दोन्ही डोस घेतल्यानंतरही सुरक्षा मिळेल असं नाही.

लस घेतल्यामुळे तीव्रता कमी होते

हा आकडा जरी मोठा दिसत असला तरी टक्केवारी कमी आहे. त्यामुळे, जर दोन्‍ही डोस घेतले असतील तरी कोविड वागणूक जपलीच पाहिजे. लस घेतल्यामुळे तीव्रता कमी होते , असे ही डाॅ. गोमारे यांनी सांगितले.

कोविड स्वभाव पाळलाच पाहिजे

लस ही 100 टक्के सुरक्षित नाही. त्यामुळे, मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि लसीकरण हे करुन घेतले पाहिजे असेही डाॅ. गोमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.