उरण : ‘आझादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी (sanjay sethi) यांनी उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांच्या उपस्थितीत जेएनपीटी बंदरालगत असलेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (CPP) येथे ड्राइव्हर्स 'सेव्ह लाइफ फाऊंडेशन' आणि 'एनरिक लाइव्हस फाऊंडेशन'च्या सहकार्याने कंटेनर-ट्रक चालकांसाठी मोफत कोविड १९ लसीकरण मोहिमेचा (corona vaccination) शुभारंभ केला आहे.
कोरोनाकाळात जेएनपीटीने कोविड-१९ चा सामना करण्यासाठी आघाडीवर राहून अनेक उपाययोजना केल्या. देशातील पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाला पाठिंबा देऊन एक सक्षम आयात-निर्यात व्यापार सुनिश्चित केला. ट्रकचालक हे सागरी पुरवठा साखळीचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्यासाठी लसीकरण मोहीम एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) हे आधुनिक सुविधांनी युक्त असून, ते ट्रकचालकांसाठी समर्पित आहे. या ठिकाणी ट्रकचालकांसाठी शयनगृह कॅन्टीन, स्वच्छतागृह, वाहनांची दुरुस्ती व देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत, असे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या जेएनपीटी रुग्णालयाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला चालना मिळाली आहे. या लसीकरण मोहिमेद्वारे आम्ही जवळपास २० हजारांहून अधिक नागरिकांना कोविड १९ लस दिल्या आहेत. शिवाय जेएनपीटीच्या समर्पित कोविड १९ आरोग्य केंद्राने (डीसीएचसी) शून्य कोविड रुग्ण नोंदवून एक नवीन टप्पा गाठला आहे. कोविड -१९ च्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय सामग्रीच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असेही सेठी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.