मुंबई : कोविड 19 विरोधात लसीकरण (corona vaccination) हेच सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. मुंबईत पहिला डोस (Vaccination first dose) 105 टक्क्यांच्या वर पोहोचले आहे आणि दुसरा डोस (second dose) 77 टक्क्यांवर पोहोचला आहे. पालिकेने (BMC) वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण सुरू केले असून आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेत (Vaccination Drive) 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर असून या वयोगटातील 103 टक्के नागरिकांना पहिला तर 86 टक्के नागरिक (Full vaccinated people) दोन्ही डोस घेऊन पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत. मात्र, ज्यांचे लसीकरण सर्वात आधी सुरू झाले म्हणजेच आरोग्य कर्मचारी (Health Authorities) आणि फ्रटंलाईन वर्कर्स हे अजून लसीकरणात पिछाडीवर आहेत.
मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी 77% पात्र लोकसंख्येचे कोविड विरूद्धचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर, 105% नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला असल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक आणि पूर्ण लसीकरणामध्ये 86 टक्के प्रमाण हे 45-59 वयोगटातील आहे, त्यापाठोपाठ 18 ते 44 वयोगटातील 73 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर, 67 टक्के 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईतील एकूण लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी 10 ते 15% नागरिक हे मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. जे मुंबईत काही कामानिमित्त येतात.
18 ते 44 वयोगटातील 109 टक्के लसीकरण
18 ते 44 वयोगटातील 109 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर, 73 टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 18 ते 44 वयोगटातील 10310330 नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, 9,236,500 किंवा 9.2 दशलक्ष ही शहरातील लक्ष्यित प्रौढ लोकसंख्या आहे ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ते लसीकरणासाठी पात्र आहेत. वयोगटातील लाभार्थी किंवा पात्र नागरिकांची सर्वाधिक संख्या 5,684,800 किंवा 5.6 दशलक्ष जे 18 ते 45 वयोगटातील आहेत. त्यापैकी, 73% नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 109% नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर 45 ते 59 वयोगटाचे नागरिक असून 2,082,100 लाभार्थी आहेत, या वयोगटात 86% पूर्ण लसीकरण झाले आहे आणि 103% नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला आहे.
60 वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकूण 1,469,600 किंवा 1.4 दशलक्ष लाभार्थ्यांपैकी 67% नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आणि 83% नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला आहे. दरम्यान, उशिरा लसीकरण सुरू झाले तरी 18 ते 44 हा वयोगट वगळता इतर सर्व वयोगटातील नागरिकांचे 73 टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण होऊन हे नागरिक सुरक्षित झाले आहेत. पण, या वयोगटात किमान 109 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
"लसीकरणात आता सर्वच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत आहे. दुसरा डोस वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण, जास्तीत जास्त लसीकरण झाले तर संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव होईल."
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.