मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं. त्यात मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील जी दक्षिण विभाग कोरोनाचं संक्रमण आणि रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर होता. जी दक्षिण विभागात वरळी आणि प्रभादेवी सारखा भाग येतो. मात्र आता हा परिसर रुग्णवाढीमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबईतील असलेल्या २४ विभागातील जी दक्षिण परिसरातील रुग्णवाढही कमी झाली आहे. या भागातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५४ दिवसांवर पोहोचला आहे.
रुग्णसंख्येत वरळी, प्रभादेवीचा भाग असलेला जी दक्षिण विभाग सतत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या विभागातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली. ऑक्टोबरपासून या भागातील रुग्णवाढीचा दर अर्ध्या टक्क्यापेक्षाही खाली आला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी मुंबईत सरासरी १०० दिवसांवर असून, वरळी, प्रभादेवीत १५४ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच वरळीत ही कोरोनानं थैमान घालण्यास सुरुवात केली. वरळी हा भाग एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. २६ मार्चला वरळी कोळीवाड्यात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर त्या भागात रुग्णांची संख्या वाढतच गेली.
१ एप्रिलला संपूर्ण कोळीवाडा प्रतिबंधित करण्यात आला. त्यानंतरही प्रभादेवी, वरळी, बीडीडी चाळीत कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. त्यामुळे जी दक्षिण विभाग रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावरच होता. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे या विभागातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली. ऑक्टोबर महिन्यापासून या भागातला रुग्णवाढीचा दर अर्ध्या टक्क्यांपेक्षाही खाली आला.
Corona Virus cases G South worli prabhadevi under control less patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.