Corona Virus: मुंबईत चाचण्यांच्या संख्येत घट

मुंबईतील दैनंदिन कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली असून त्यामुळे नव्या रुग्णांची संख्या कमी दिसत आहे.
Corona Virus Test
Corona Virus TestTwitter
Updated on

मुंबई: मुंबईतील दैनंदिन कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली असून त्यामुळे नव्या रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याचे बोलले जाते. मंगळवारी मुंबईत 30 हजार 428 लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या. गेल्या आठवड्याभरापासून दैनंदिन चाचण्यांमध्ये घट दिसत असून साधारणता 20 हजार चाचण्या कमी झाल्या आहेत.

यापूर्वी दैनंदिन 60 हजारांहून अधिक चाचण्या होत होत्या. त्यात आता निम्याने घट झाली आहे.

मंगळवारी 30 हजार 428

सोमवारी 28 हजार 328

रविवारी 40 हजार 298 चाचण्या केल्या गेल्या.

Corona Virus Test
BKC लसीकरण केंद्र पुन्हा बंद, केवळ 10 ते 12 डोस शिल्लक
Corona Virus Test
रेमिडीसीवीर इंजेक्शन खासगी व्यक्तीला मिळतातच कसे?, हायकोर्टाचा सवाल

मुंबईत बाधित होण्याचे प्रमाण काहीसे घटले आहे. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी झाला असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले. गरजेनुसार चाचण्या गेल्या जात असून केंद्र किंवा पथकांची संख्या कमी केलेली नाही. रुग्णांची संख्या कमी झाल्याने चाचण्यांची संख्या देखील कमी झाल्याचे डॉ गोमारे म्हणाल्या.

पॉझिटिव्हीटी दर कमी होऊन 11.91 पर्यंत खाली आला आहे. आतापर्यंत 52,02,490 चाचण्या करण्यात आल्या असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 66 हजार 045 इतकी आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona virus decrease the number of tests in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.