कोरोनाला रोखण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांकडून 'हा' पॅटर्न लागू

कोरोनाला रोखण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांकडून 'हा' पॅटर्न लागू
Updated on

मुंबईः कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. एकीकडे मुंबईतील कोरोना नियंत्रणात येत असताना नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं मोठी वाढ होत असते. तसंच मृतांची संख्याही दररोज वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता रविवारी ३८८ नवे रुग्ण वाढले असून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३ हजार ६१८ झालीय. अशातच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाचा प्रार्दुभाव नवी मुंबईत रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्यास सुरुवात केलीय. 

आयुक्त बांगर यांनी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः विभाग कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आठ विभागाचे सह आयुक्त विभाग अधिकारी, विभाग कार्यक्षेत्रातील जुहूगाव आणि वाशीगाव या दोन्ही केंद्राचे आरोग्य अधिकारी तसंच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना अधिक रितीने उपाययोजना राबवण्याचे निर्देशित करण्यात आलेत. या ठिकाणी वाशी विभागाचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त उपस्थित होते. 

नवी मुंबईत कसा असेल धारावी पॅटर्न 

ठोस उपाययोजना करुनच कोरोना कमी करायचा आहे. मात्र या काळात अन्य आजारांच्या रुग्णांवर दुर्लक्ष करुन चालणार नाही. अन्य आजार असलेल्या रुग्णांवरही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या विभाग क्षेत्रात किती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्या क्षेत्रात किती जणांचा मृत्यू झाला. याकडे बारकाईनं लक्ष ठेवून शोध आणि तपासणी वाढवण्याची भर देण्याचं आयुक्तांनी ठरवलं आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना दिवसातून किमान दोन वेळा फोन करुन त्यांची प्रकृती जाणून घ्यावी, असे निर्देशही देण्यात आलेत.

ज्या भागात ५ पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्या भागात साधारण १०० मीटरचे क्षेत्र तिसऱ्या प्रकारचे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. त्या परिसराची रितसर तपासणी करुन आत-बाहेर पडण्याच्या सीमा उंच बॅरिकेटे्स लावून बंद कराव्यात. अशा भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहिलं. पोलिसांनी  नागरिकांना वस्तू कशा उपलब्ध करुन देता येतील यांचे नियोजन करावं. तसंच लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याकडे दक्षता घ्यावी, असे देखील आयुक्त बांगर यांनी म्हटलंय. 

आपण कोरोनावर मात करु शकतो असं म्हणत आयुक्तांनी कोरोनाचा वाढता प्रभाव रोखणं याकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच  बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरुवात केली आहे. बांगर यांच्यासमोर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे.

Corona virus fight municipal commissioner abhijit bangar dharavi pattern applied navi mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.