मुंबईः मुंबई शहरातील रुग्णवाढ नियंत्रणात दिसत असली तरी मृत्यूदर मात्र वाढतोय. मुंबईतील कोरोना बधितांचा आकडा 1,01,224 वर पोहोचला असून 5,711 रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे. मुंबईत दररोज सरासरी 200 मृत्यू होत आहेत त्यामुळे मृत्यूदर वाढून 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. अगोदरच्या मृत्यूंची नोंद तसेच मुंबईत बाहेरील रुग्णांची वाढती संख्या यामुळे मृत्यूदर वाढला असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर ठरले आहे. मुंबईत आजही दररोज सरासरी 800 ते 1200 रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील रुग्णसंख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असली तरी उठला मृत्यूदर हा नियंत्रणात होता. साधारणता 20 मे च्या दरम्यान मुंबईत 22, 563 रुग्ण तर 800 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृत्यूदर 3.54 इतका होता. मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारने डेथ ऑडिट कमिटीची स्थापना केली. याला कमिटीने वेगवेगळ्या उपाययोजना करून मुंबईतील मृत्यूदर 3 टक्क्यांच्या आसपास ठेवण्यात यश मिळाले.
पावसासह मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. रुग्णांसह मृत्यूदरात ही वाढ होऊ लागली. महिन्याभरापूर्वी मुंबईतील रुग्णसंख्या ही 65,265 वर पोहोचली तर मृतांचा आकडा हा 3559 इतका होता.त्यामुळे मृत्यूदर हा 3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत पोहोचला. तर 19 जुलैला मुंबईतील रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊन ती 1,01,224 इतकी झाली असून 5,711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदरात वाढ होऊन तो 6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूदर असलेले
अहमदाबाद शहर पहिल्या क्रमांकावर असून तेथील रुग्णसंख्या 23,111 तर 1503 मृत्यू झाले आहेत. तेथील मृत्यूदर हा 6.5 इतका आहे. अहमदाबाद नंतर सर्वाधिक मृत्यूदर असलेले मुंबई हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. त्या खालोखाल सर्वाधिक मृत्यूदर असलेले दिल्ली हे तिसरे शहर ठरले असून तेथील रुग्णसंख्या 1,22,000 इतकी आहे. त्यातील 3,597 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 2.94 इतका आहे. तर चेन्नई शहरातील रुग्णसंख्या 79,662 वर पोहोचली असून आतापर्यंत 1295 मृत्यु झाले आहे. तेथील मृत्यूदर 1.6 इतका आहे.
राज्यात सर्वाधिक मृत्यूदर असलेले मुंबई हे पाहिल्या क्रमांकाचा शहर ठरले आहे. तर त्यानंतर ठाणे 623 मृत्यू तर 3.61 मृत्यूदरासह दुसरा क्रमांक ,पुणे 1,019 मृत्यू तर 2.7 टक्के मृत्यूदरासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर राज्य किंवा शहरांच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्या अधिक आहे. शिवाय मुंबईत बाहेरील रुग्णांवर देखील उपचार होत असल्याने मृत्यूदर वाढला असल्याचे मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांचे म्हणणे आहे.
संपादनः पूजा विचारे
corona virus mumbai death rate increase to 6 percentage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.