मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा मुंबई शहरात झालेला आहे. मुंबई शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुंबईत काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मात्र मृतांची संख्या मात्र ७ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.५ टक्के असून तो कमी करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ९७९ नवीन रुग्ण आढळलेत. तर दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शुक्रवारी ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृतांची एकूण संख्या ७,०३५ वर पोहोचली. १२ ऑगस्टला ५० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १३ ऑगस्टला एकूण ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर ९७९ नवीन रुग्ण आढळले असून ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर दिवसेंदिवस कमी होत असून रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ०.८० टक्के आहे. मात्र मुंबईतील नानाचौक-मलबार हिल, गिरगाव-मुंबादेवी, आणि बोरिवली परिसरात ही रुग्णवाढ सर्वात जास्त म्हणजे १.३ टक्के इतकी आहे. नानाचौक-मलबार हिल भागात दर आठवडयात दररोज सरासरी ५० रुग्णांची भर पडते. बोरिवली भागात गेल्या अनेक आठवडयांपासून दररोज किमान ७० रुग्णांची नोंद होतेय. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ८४ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र १२ विभागांमध्ये हा कालावधी ८४ दिवसांपेक्षा कमी आहे. नानाचौक-मलबार हिल परिसरात हाच दर ५० दिवसांइतका कमी आहे.
मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २८ हजार ५५० इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ९०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १८६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. १९ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण बोरिवली परिसरात आहेत. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी मुंबईत ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी ३७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३३ पुरुष आणि १४ महिला होत्या. मृतांचा आकडा सात हजारांच्या पुढे गेला असून त्यात ५० वर्षांपुढील रुग्णांची संख्या पाच हजारापेक्षा अधिक आहे. तर ६० ते ७० वयोगटातील मृतांची संख्या सर्वात जास्त म्हणजे २ हजार आहे. एकूण मृतांमध्ये ४० टक्के प्रमाण महिलांच, तर ६० टक्के प्रमाण पुरुषांचे आहे.
corona virus mumbai mortality rate high a big worry for bmc
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.