मुंबई: मुंबई, ठाण्यासह 21 जिल्ह्यांतील सक्रिय रुग्ण घटले आहे. राज्यात बरे होण्याचा दर 95.37 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. राज्यात 14 जिल्हे असे आहेत जेथे गेल्या आठवड्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे.
राज्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रुग्णवाढीचा दर हा 7.28 इतका होता. त्यात आता मोठ्या प्रमाणात घट झाली असून 0.13 पर्यंत खाली आला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी हा एप्रिल मध्ये 9.89 दिवसांवर होता. तो आता 579.74 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 14.89 टक्के इतका होता तो आता 96.37 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यातील मृत्यूदर नियंत्रणात आणण्यात यश आले असून मृत्यूदर 4.38 टक्क्यांवरून 2.56 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण प्रतिदश लक्ष 917 इतके होते ते आता 1,11,690 इतके झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिसते.
राज्यात 4 जानेवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 48,801 इतकी होती. महिन्याभरात त्यात 10 हजारांची घट झाली. 3 फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 37,516 पर्यंत कमी झाली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून तेथील कोरोनाचा जोर कमी झाल्याचे दिसते. मात्र राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये मात्र सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे.
या जिल्ह्यात सक्रिय रुग्ण वाढले
सांगली, कोल्हापूर, जळगाव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यात सक्रिय रुग्ण घटले
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, नांदेड, अकोला, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
मुंबई-ठाणे-पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली असली तरी सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या ही पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात 9,123 सक्रिय रुग्ण असून ते एकूण संख्येच्या 24.32 टक्के इतके आहेत. त्यानंतर ठाणे 6446(17.18), मुंबई 5,628(15.00), नागपूर 3,334(8.89), नाशिक 1253(3.34) मध्ये सक्रिय रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्णांचा तपशील (2 फेब्रु 2021)
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Corona virus updates Number active patients Mumbai Thane decreased
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.