कोरोनाचे व्हेरियंट शोधणारी मशीन, 'या' रुग्णालयात प्रयोगशाळेची सुरुवात

जीनोम सिक्वेंसिंग प्रयोगशाळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात सुरू होईल.
Corona Virus
Corona VirusSakal media
Updated on

मुंबई : कोरोनाचे बदलती रुपे (Corona virus variantions) शोधणारी मशीन (machine) या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 28 जुलैपर्यंत मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहे. ही मशीन सिंगापूरमधील (Singapore) कार्गोमध्ये अडकली होती. मशीन येताच पालिकेची जीनोम सिक्वेंसिंग प्रयोगशाळा (laboratory) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) सुरू होईल. ही प्रयोगशाळा सुरु झाल्याने, जीनोम सिक्वेंसिंगसाठी पालिकेला पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागणार नाही. ( Corona virus variations searching Machin launches in July month end mumbai-nss91)

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट  नियंत्रणात आली असली तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिंता आधीच सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोना नवीन रूपांमध्ये बदलत आहे. कधी डेल्टा प्लस, तर कधी लॅम्बडा अशी कोरोनाची रूपे देश आणि जगभरात आढळतात. या नवीन प्रकाराचा धोका टाळण्यासाठी पालिका कस्तुरबा रुग्णालयात आपल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत जीनोम सिक्वेंसींग चाचणी घेणार आहे.

Corona Virus
BMC: पैसे घेऊन अभियंत्यांची बढती केली, काँग्रेसचा आरोप

कस्तुरबा प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी साांगितले की, या जीनोम सिक्वेंन्ससाठी अमेरिकेने बनवलेले नॅनोपुर सिक्वेंसींग टेक्नॉलॉजीवर आधारित मशीन सिंगापूरमधून आयात केले जात आहे. पण,ही मशीन कार्गोमध्ये अडकली होती. ही मशीन 28 जुलैपर्यंत मुंबईत पोहोचेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मशीन येताच जिनोम सिक्वेंसींग प्रयोगशाळा एका आठवड्यात सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.