Coronavirus : रुग्णवाहिकेबाबत नवी मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय, रुग्णांची हेळसांड थांबणार?

ambulance
ambulance
Updated on

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणांप्रमाणे त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. अशाच पद्धतीने रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता आता रुग्णांची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिका महापालिकेद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 26 मे रोजी 'सकाळ'च्या अंकात `नऊ रुग्णांचा एकत्र प्रवास' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा निर्णय घेतला आहे. 

नेरूळ सेक्टर सहामधील लक्षणे नसणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सेक्टर 10 मधील तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारा रुग्ण या सर्वांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रकार 25 मे रोजी उघडकीस आला होता. नेरूळमधील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षतेने व उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णवाहिकेचा पाठपुरावा केला होता. याबाबत सत्य परिस्थिती जाणून घेत 'सकाळ'ने रुग्णांची कशा पद्धतीने गैरसोय केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली होती. याबाबत संतापलेल्या घोडेकर यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. तसेच पालिकेच्या या बेजबाबदार कारभाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती.

बातमीनंतर जनमाणसात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच अण्णासाहेब मिसाळ यांनी वेगवेगळ्या रुग्णवाहिका सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्या होत्या. मिसाळ यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्याकडे रुग्णवाहिकांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. गर्भवती महिलांसाठी वेगळ्या रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णासाठी वेगळी रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी वेगळी आणि संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी वेगळी अशी रुग्णवाहिकेबाबत वर्गवारी करण्यात आली आहे. 

कशी असेल व्यवस्था?
कोव्हिड-19 व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी सहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. गर्भवती महिलांच्या प्रसूतीला जाण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाता एक अशा पाच रुग्णवाहिका, एनएमएमटीच्या ताफ्यातील 8 बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले आहे. त्यांचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची ने-आण करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून तीन अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

Coronavirus: Important decision of Navi Mumbai Municipal Corporation regarding ambulance

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.