दिलासादायक! मुंबईत कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

Covid-19-Updates
Covid-19-Updates
Updated on

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाल्याची पाहायला मिळाली. आज दिवसभरात 9 हजार 857 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. काल मुंबईत सुमारे ११ हजार नवे कोरोनाबाधित आढळले होते. आज त्या तुलनेत या आकड्यात घट पाहायला मिळाली. मुंबईत आज एकूण 21 रूग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मुंबईत आज आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 62 हजार 302 वर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 74 हजार 522 इतकी झाली आहे.

आज दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 797 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्या 13 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 11 पुरुष तर 10 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्ण 40 ते 60 या वयोगटातील होते, तर 16  रुग्णांचे वय 60 वर्षांच्या वरचे होते. आज एकूण 3 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 3 लाख 74 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 74 हजार 522 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के आहे. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 1.70 टक्के आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी कमी होऊन 40 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 43 लाख 6 हजार 53 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मुंबईत 70 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 748 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24 हजार 6 अति जोखमीचे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत.

दादरमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ; धारावीतही रूग्णसंख्या पन्नाशीनजीक

जी-उत्तर विभागात आज 263 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 18 हजार 626 झाली आहे. धारावीत आज 47 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 238 वर पोहोचली आहे. तर 828 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये आज सर्वाधिक 122 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 642 वर झाली आहे, तर 1 हजार 328 सक्रिय रुग्ण आहेत. माहीम मध्ये 94 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 6 हजार 746 इतके झाले आहेत. तर 1 हजार 465 सक्रिय रुग्ण आहेत.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.