कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत २५ टक्के मृत्यू

कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत २५ टक्के मृत्यू गेल्या चार महिन्यात 3 हजार 976 मृत्यूंची भर Coronavirus Second Wave Mumbai sees 25 per cent deaths in last 4 Months
Mumbai-CSMT
Mumbai-CSMT
Updated on

गेल्या चार महिन्यात 3 हजार 976 मृत्यूंची भर

मुंबई: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत 25.6 टक्के मृत्यू झाले. एकूण 15 हजार 499 मृत्यूंपैकी 3 हजार 976 मृत्यूंची भर केवळ या चार महिन्यांत पडली. तर 54.8 टक्के रुग्णवाढ झाली असून एकूण 7 लाख 23 हजार 551 रुग्णांपैकी 3 लाख 96 हजार 305 रुग्ण केवळ या चार महिन्यांमध्ये वाढले. (Coronavirus Second Wave Mumbai sees 25 per cent deaths in last 4 Months)

Mumbai-CSMT
'मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले असतानाही ही दडपशाही कशासाठी?'

साधारणत: मार्च महिन्यात कोविडची दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात तिने उग्र रूप धारण केले. मे महिन्याच्या शेवटी लाट ओसरू लागली. 4 मे रोजी 11 हजार 206 नव्या रुग्णांसह एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. मार्च महिन्यात 88,856 कोविड रुग्णांची नोंद झाली तर याच महिन्यात 215 रुग्ण दगावले. एप्रिल महिन्यात 2,33,698 नवे रुग्ण तर 1,435 मृत्यू, मे महिन्यात 56,817 नवे रुग्ण आणि 1,701 मृत्यूसह दुसऱ्या लाटेतील एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. तर जून महिन्यात 16,934 मृत्यूसह 625 मृत्यूची नोंद झाली.

Mumbai-CSMT
'जहाँ हमारे नाम से आग लग जाती है', संजय राऊतांचे नवीन ट्वीट

दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढली. तसेच त्यांना बरे व्हायला देखील अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे मी महिन्यात मृतांचा आकडा वाढल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले होते. एप्रिल मध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मे महिन्यात मृत्यूची संख्या अधिक वाढल्याचे ही त्यांनी नोंदवले. जून महिन्यात मात्र दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या कमी होतांना दिसली. शनिवारी 575 नव्या रुग्णांची भर पडली तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा 7,24,130 तर 15,520 मृत्यू नोंदवले गेले. तर 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांपैकी सुमारे 47% असिमटेमॅटिक तर 44% रुग्ण सीमटेमॅटिक रुग्ण आहेत. तर गंभीर रुग्णांचे प्रमाण 9 % इतके आहे.

Mumbai-CSMT
भाजपच्या आशिष शेलारांशी गुप्त भेट? संजय राऊतांनी दिलं उत्तर

मुंबईतील मृत्युदर 2% इतका आहे. तर बरे होण्याचा दर 96 % वर पोहोचला आहे. शनिवारी 35,491 चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर 1.6% आहे. मुंबईत आतापर्यंत 72,55,318 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील 9.97 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()