कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात साधारणता 21 डिसेंबर पासून झाली. सुरुवातीला दुसऱ्या लाटे प्रमाणेच रुग्णांची संख्या वेगाने वाढली.
मुंबई - दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट (Third Wave) ऐन भरात असतांना रुग्ण (Corona Patients) वाढले. मात्र मृत्यू नियंत्रणात (Death Control) ठेवण्यात यश आले. असे असले तरी पुढील 2 ते 4 आठवडे महत्वाचे असून त्या दरम्यान कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू मध्ये वाढ होण्याची भीती वैद्यकीय तज्ञ (Medical Expert) व्यक्त करत आहेत.
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात साधारणता 21 डिसेंबर पासून झाली. सुरुवातीला दुसऱ्या लाटे प्रमाणेच रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र मृत्यू नियंत्रणात राहिले. पहिल्या दोन आठवड्यांची तुलना केली असता दोन आठवड्यांपेक्षा तिसऱ्या आठवड्यात अधिक मृत्यू नोंदवले गेले.या आठवड्यात राज्यभरात मुंबईत 79 तर राज्यात 303 मृत्यूंची नोंद झाली. मृत्यूंचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे असे राज्य मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
कोरोना ची दुसरी लाट ऐन भरात असतांना पहिल्या आठवड्यात 6798 ,दुसऱ्या आठवड्यात 9358 तर तिसऱ्या आठवड्यात 9631 मृत्यू झाले होते. एप्रिल ते महिन्या दरम्यानच्या तीन आठवड्यात एकूण 25,787 मृत्यूंची नोंद झाली होती. तर तिसरी लाट ऐन भरात असतांना पाहिल्या आठवड्यात 59,दुसऱ्या आठवड्यात 120 तर तिसऱ्या आठवड्यात 135 मृत्यू झाले. 26 डिसेंबर ते 16 जानेरी दरम्यान एकूण 314 मृत्यूंची नोंद झाली.
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत मृत्यू कमी असले तरी मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे डॉ.सुपे म्हणाले. राज्यभरातील छोट्या शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे गंभीर पणे बघावे लागेल. अन्यथा पुढील फेब्रुवारी शेवट ते मार्च च्या पहिल्या आठवड्या पर्यंत मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे ही सुपे म्हणाले.
कोविडच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये दीर्घकालीन आजार असलेल्या वयस्क व्यक्तींचे मृत्यू अधिक झाले. मात्र दुसरी लाट ऐन भरात असतांना मात्र 1 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील मुलांचे मृत्यू झाले नव्हते. तिसऱ्या लाटेमध्ये मात्र अनुक्रमे 4 आणि 6 असे एकूण 10 मृत्यू नोंदवले आहेत. मात्र त्यात चिंता करण्यासारखे काहीही नसल्याचे सुपे म्हणाले. तिसरी लाट नियंत्रणात असून मृत्यू देखील नियंत्रणात आहेत. रुग्ण वाढीवर टास्क फोर्स लक्ष ठेवून असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले.
तिसरी लाट सुरु होण्या आधी मृत्यूंची संख्या पूर्णतः नियंत्रणात होती. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात 54 ,दुसऱ्या आठवड्यात 49 तर तिसऱ्या आठवड्यात 54 असे एकूण 157 मृत्यू नोंदवण्यात आले. त्यानंतरच्या तीन आठवड्यांमध्ये त्याच्यात वाढ होत गेली.
तिसऱ्या लाटेतील मृत्यू
कालावधी मृत्यू
27 डिसें ते 2 जाने - 59
3 जाने ते 9 जाने - 120
10 जाने 16 जाने - 135
...................................
एकूण - 314 मृत्यू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.