मुंबईकरांसाठी चांगली बातमी! रुग्णदुपटीचा कालावधी ५५० दिवसांवर

 coronavirus
coronavirusGoogle
Updated on
  • रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

मुंबई: कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर हा 0.12 टक्के इतका झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी हा 550 दिवसांवर गेला आहे. मुंबईकरांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15 हजार 786 वर आला आहे. मुंबईत दिवसभरात 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6 लाख 69 हजार 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Coronavirus Update in Mumbai Doubling Rate has gone past 550 Days)

 coronavirus
Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

मुंबईत दिवसभरात 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 66 वर पोहोचला. मृत झालेल्यापैकी 22 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पुरुष तर 16 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 11 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 17 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत दिवसभरात 728 नवीन रुग्ण सापडले तर 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7 लाख 12 हजार 329 इतकी झाली आहे. आतापर्यंत 64 लाख 53 हजार 499 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 coronavirus
बससाठी चाकरमान्यांच्या रांगा; लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच

मुंबईत 26 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 96 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7 हजार 751 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 858 करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.