Coronavirus: मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 733 दिवसांवर

Coronavirus: मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 733 दिवसांवर मुंबईत 661 नवे रुग्ण, तर 21 रुग्णांचा मृत्यू Coronavirus Update Mumbai Patients Doubling Rate above 730 days
Coronavirus
CoronavirusSakal
Updated on

मुंबईत 661 नवे रुग्ण, तर 21 रुग्णांचा मृत्यू

मुंबई: शहरात दिवसभरात 661 नवीन रुग्ण सापडले असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,22,879 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 489 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,96,594 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 71,81,452 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.9% इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 733 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 8,498 हजारांवर आला आहे. (Coronavirus Update Mumbai Patients Doubling Rate above 730 days)

Coronavirus
सेक्सटॉर्शन प्रकरणात तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबईत दिवसभरात 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 472 इतका झाला आहे. मृतांपैकी 12 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पुरुष तर 9 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णाचे वय 40 च्या खाली होते. 6 रुग्णाचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 12 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

Coronavirus
लोकल प्रवास बंदी, तर मतदानावर बहिष्कार

मुंबईत 11 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 75 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5,437 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 828 करण्यात आले.

Coronavirus
मुंबईत 83% ऑक्सिजन बेड्स रिकामे

धारावीमध्ये 3 रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 6898 झाली आहे. माहीममध्ये 8 नवे रुग्ण सापडले असून माहीममधील एकूण रुग्ण 10,003 झाले आहेत. दादर मध्ये 7 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9678 वर पोचला आहे. जी उत्तर मध्ये 18 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,579 झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.