मुंबई : देशात उभारली गेलेली पहिलीवहिली क्षेपणास्त्रवाहू कॉर्व्हेट युद्धनौका (Corvette warship) आयएनएस खुकरी (INS Khukri) हिला काल 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नौदल सेवेतून (Indian Navy) निरोप देण्यात आला. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी हा निरोप (send off ceremony) समासंभ झाला. या युद्धनौकेची निर्मिती माझगाव डॉकमध्ये (Mazgaon Dock) 1989 मध्ये झाली. तेव्हाचे संरक्षणमंत्री कृष्णचंद्र पंत (krishna chandra pant) यांच्याहस्ते तिला नौदलताफ्यात समाविष्ट करून घेण्यात आले. त्यानंतर ही युद्धनौका पश्चिम आणि पूर्व नौदल ताफ्यात कार्यरत होती. (INS khukri send off ceremony after thirty two years work from navy)
या नौकेचे सारथ्य एकूण 28 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. तर आपल्या कार्यकालात या नौकेने विविध उद्दीष्टांसाठी एकूण साडेसहा लाख सागरी मैल एवढा प्रवास केला. हे अंतर 30 पृथ्वीप्रदक्षिणांइतके किंवा पृथ्वीवरून तीनदा चंद्रावर जाण्याइतके आहे. नेपाळी गुरखा नागरिकांचे आवडते शस्त्र असलेल्या खुकरीचे नाव मिरवणारी ही नौका भारतीय सेनादलातील गौरखा ब्रिगेडशी संलग्न करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.