सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंअर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?

सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंअर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 12 हजार कोटींनी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कॉस्ट कटिंगचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व विभागांच्या निधीत 35 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्षाची सुरवात होताच मुंबईसह देशात कोविडमुळे कहर सुरु झाला. त्यामुळे महापालिकेला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. जूलैपर्यंत महापालिकेच्या   आर्थिक उत्पन्नात 4 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. यानुसार वर्षभरात 12 हजार कोटी रुपयांची घट होण्याचा अंदाज पालिकेने तयार केला आहे.

मुंबई महापालिकेचा 2020-21 या वर्षाचा अर्थसंकल्प 33 हजार कोटी 441 कोटींचा होता. तर 12 हजारांची तुट होऊन 21 हजार 441 कोटी पर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थसंकल्प घटणार असल्याने महापालिकेने आता कॉस्ट कटिंगचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. सर्व विभागांकडून तातडीचे प्रकल्प, लांबणीवर टाकता येतील अशा प्रकल्पांची माहिती मागवली जात आहे. त्यावरून कॉस्ट कटिंगचा आराखडा तयार करुन तो अंतिम मंजूरीसाठी महासभेत मांडला जाऊ शकतो. 

सध्याच्या परीस्थीतीनुसार मुंबईचा अर्थसंकल्प सुमार 35 ते 36 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यानुसार सर्व विभागांच्या निधीत कपात केली जाऊ शकते. मात्र, महत्वाच्या कामांसाठी निधी कमी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेही पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

महसुली उत्पन्नाला फटका 

महापालिकेला 85 टक्के उत्पन्न महसुली उत्पन्नातून मिळते. यात विविध कर, शुल्क, गुतवणूकीवरील व्याज तसेच जकाती रद्द झाल्याबद्दल राज्य सरकारकडून मिळणारी भरपाई याचा समावेश आहे. या भरपाई पोटी राज्याकडून वर्षाला 9 हजार 799 कोटी रुपयेे मिळणार असून प्रत्येक महिन्याला 800 कोटी रुपये मिळतील. जूनपर्यंत यातील निम्मे अनूदान मिळाले पण या महिन्यात पुर्ण अनूदान मिळाले आहे ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, जगाच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला असल्याने त्याचा परीणाम महसूली उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.

गारगाई धरण प्रकल्प लांबणीवर ?

कोस्टल रोडचे काम सुरु झाले आहे. तर ,मुलूंड गोरेगाव लिंक रोडच्या भुयारी मार्गासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. इतर टप्प्यातील कामं सुरु झाली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर कॉस्ट कटिंगचा परीणाम होण्याची शक्यता आहे. मात्र,गाररगाई धरणाचे काम लांबणीवर टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तरतूद असलेले 300 ते 350 कोटी वाचतील.

महापालिकेचं आतापर्यंत 4 हजार कोटी रुपयांनी उत्पन्न कमी झाले आहे. त्यानुसार वर्षाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व विभागांकडून त्यांच्या प्रकल्पांबाबत माहिती मागविण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अर्थसंकल्पात नियोजित केलेला काही खर्चही झालेला नाही. तो निधीही वाचला आहे. असं मनपा अतिरिक्त आतुक्त पी वेलारसू म्हणालेत.  

अर्थसंपल्पातील अंदाजित उत्पन्न [ स्त्रोत - उत्पन्न (कोटी) उत्पनातील हिस्सा (टक्के) ]

  • महसुली -- 28448.30---85 
  • अनुदान --- 222.35---1
  • ठेवी मोडून -- 4380.77---13
  • विकास आणि पुनर्विकासाचा -386.21---1
  • प्रिमीयम 
  • इतर -- 3.39 ---नगण्य 
  • एकूण -- 33441.02 -- 100 

( संकलन - सुमित बागुल ) 

cost cutting plans in indias richest mumbai municipal corporation budget might decreased by 12 thousand crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.