Crime News: 'सुट्टीसाठी गावावरून आणलं अन्...' वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याला अटक

एका सतर्क ऑटोरिक्षा चालकाने एका मुलीला वेश्या व्यवसायात जाण्यापासून वाचवले
Crime news
Crime newsesakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंबधी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच एका सतर्क ऑटोरिक्षा चालकाने एका मुलीला वेश्या व्यवसायात जाण्यापासून वाचवले आहे. एका मुलीला मुंबईत सुट्टीसाठी घेऊन आल्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी विकत असलेल्या जोडप्याला पकडण्यात ऑटोरिक्षा चालकाने पोलिसांना मदत केली आहे.

टिळक नगर पोलिसांनी सूर्यभान शर्मा (21) आणि त्यांची पत्नी आंचल अमन (20) यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीला (18) रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले असून तिच्या पालकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुलीसह हे जोडपे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पवन एक्स्प्रेसने मुंबईला आले. आंचल मुलीसोबत वाट पाहत असताना, अमन एलटीटी स्टेशनच्या बाहेर गेला आणि एका ऑटोरिक्षा चालकाकडे रेड लाइट एरियाबद्दल चौकशी केली.

Crime news
Raj Thackrey: मनसे विरुद्ध भाजप संघर्षाला सुरुवात, ठाकरे-शेलारांमध्ये जुंपली! मोठ्या नेत्यांवर...

ऑटो रिक्षाचालकाने यासंबधी विचारले असता सूर्यभान शर्मा याने सांगितले की, मला एका मुलीला विकायचे आहे. त्यानंतर तातडीने ऑटो रिक्षाचालकाने ताबडतोब टिळक नगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या जोडप्याला अटक केली आणि मुलीची सुटका केली आहे.

अमनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'तो युपीमधील त्याच्या गावी या मुलीला भेटला जिथे त्याने तिला लग्नाचे आणि मुंबईत सुट्टीसाठी जाण्याचे आमिष दाखवले'. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा अमन त्या मुलीला रेड लाईट एरियामध्ये विकण्यासाठी गेला होता.

Crime news
Sameer Wankhede Case Update: 'अतिक अहमदसारखा माझ्यावर देखील...',समीर वानखेडेंची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

टिळक नगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे, यांनी सांगितले की, अमनला 40,000 रुपये हवे होते आणि म्हणून त्याने मुलीला विकून त्याच्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्याची पत्नी आंचलला त्याच्या या प्लॅनबद्दल माहिती होती आणि तिनेही या कटात सहभाग घेतला होता.या जोडप्याने यापूर्वी इतर मुलींनाही विकले आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Crime news
Raj Thackrey: राज ठाकरे अचानक भाजपच्या विरोधात कसं बोलू लागले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()