Dombivli Dahi-Handi : कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवास परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेतील शिंदे व ठाकरे गटात चढाओढ लागली होती. पोलिसांनी शिंदे गटास ही परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून याचा निषेध नोंदविण्यात आला होता. हा वाद पुढे उच्च न्यायालयात गेला.
उच्च न्यायालयाने शिंदे गटास परवानगी दिली असून ठाकरे गटाला शिवाजी चौक पासून 100 मीटर दूर पर्यायी जागेवर दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता शिवाजी चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी शिवसेना शाखेकडून दहिहंडी साजरी केली जाते. या वर्षी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती.
पोलिसांकडून शिंदे गटाला परवानगी दिली गेली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने ज्या पक्षाला नाव दिले आहे. ते ग्राह्य धरुन त्याला परवानगी दिली आहे. तर ठाकरे गटाला अन्य कोणती जागा सूचवा असे सांगितले होते. शिंदे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख
रवी पाटील आणि सचिन बासरे यांनी एकमेकांवर आरोप केल्याचे पहायला मिळाले होते. कल्याणमधील छत्रपती शिवाजी चौकात दहीहंडी साठी शिवसेना शिंदे गटाला परवानगी दिल्या नंतर उद्धव ठाकरे गटाचे सचिन बासरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाच्या खंड पिठासमोर सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने शिवाजी चौक येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यास शिवसेना शिंदे गटास परवानगी दिली आहे. तसेच ठाकरे गटास शिवाजी चौक पासून 100 मीटर दूर पर्यायी जागेवर दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशाने शिंदे गटात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. शहर प्रमुख रवी पाटील, अरविंद म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकानी शिवाजी चौकात जमून एकमेकांना पेढे भरवत या निकालाचे स्वागत केले.
याविषयी शिंदे गट कल्याण शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, 2008 सलापासून अरविंद मोरे हे शहर प्रमुख होते तेव्हापासून या दहीहंडी उत्सवाची परंपरा येथे सुरू झाली आहे. आणि ती आजतागायत आहे.
न्यायालयास आमच्या वतीने सांगण्यात आले की, पंधरा वर्षे जवळजवळ शिवसेना या ठिकाणी दहीहंडी उत्सव करते. प्रत्येक पक्षाने आपली अशी जागा निवडलेली आहे. सालाबाद प्रमाणे त्या ठिकाणी ते दहीहंडी उत्सव करत असतात. प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून आम्ही परवानगी मागितली होती. परंतु काही लोकांना जाणीवपूर्वक शिवाजी चौकात आम्हाला हंडी करू द्यायचे नव्हते असाच त्यांचा उद्देश होता. या उद्देशाने त्यांनी त्या जागेची मागणी केली. परंतु कोर्टाच्या आम्ही ते निदर्शनास आणून दिले न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेत आम्हाला न्याय दिलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.