Mumbai News : झाकीर नाईकच्या भाचीची बँक खाती कार्यरत करायला न्यायलयाची परवानगी

मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी फरार आरोपी झाकीर नाईकच्या भाचीचे गोठवलेली बँकखाते परत कार्यरत करण्याची परवानगी दिली
Court permission to operate bank accounts of Zakir Naik niece mumbai marathi news
Court permission to operate bank accounts of Zakir Naik niece mumbai marathi newsesakal
Updated on

मुंबई : मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी फरार आरोपी झाकीर नाईकच्या भाचीचे गोठवलेली बँकखाते परत कार्यरत करण्याची परवानगी दिली. सदरची बँक खाते गोठवण्याची परवानगीसाठी झाकीर नाईकच्या बहिणीची मुलगी अलिफिया नुरानीने न्यायालयात एक अर्ज दाखल केली होता, या अर्जात एनआयए तपास करत असलेली बँक खाते झाकीर नाईकशी संबंधित नसून तसेच या खात्याद्वारे कोणताही निधी नाईकने हस्तांतरित केलेला नाही.

एनआयएने या अर्जाला न्यायालयात विरोध केला होता. आरोपी झाकीर नाईक अजूनही फरार असून भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी परदेशातून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत असल्याचे एनआयएकडून न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. विशेष न्यायालयाने तिला खात्याबाबत हमीपत्र देण्याचे निर्देश देणाऱ्या याचिकेला परवानगी दिली आणि खटला संपेपर्यंत हमी म्हणून एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले.

नाईक यांच्याकडून या खात्यात निधी हस्तांतरित करण्यात आला होता या तिच्या युक्तिवादाशी न्यायालयाने सहमती दर्शवली.“दहशतवादी कारवाया” करण्यासाठी चिथावणीखोर व्यक्तव्या करण्याच्या आरोपानंतर झाकीर नाईक याच्या विरोधात 2016 मध्ये युएपीए अंतर्गत नाईकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या आधारे, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या संस्थेवर मनी लाँड्रिंगचा आरोप लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.