Anil Desai: शिवसेना खासदार अनिल देसाई यांना न्यायालयाचा दिलासा

Maharashtra: १४ उमेदवारांचे ‘नॉमिनेशन फॉर्म’ अवैध जाहीर करण्याची मागणी करत याचिका दाखल केली
Anil Desai
Anil DesaiSakal
Updated on

Mumbai : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. लोकसभा निवडणुकीतील ‘नॉमिनेशन फॉर्म’मध्ये तांत्रिक चुका असल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवाराने दाखल केलेली निवडणूक याचिका तथ्यहीन असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने फेटाळून लावली.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल देसाई निवडून आले. या मतदारसंघातून १५ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी महेंद्र भिंगारदिवे या अपक्ष उमेदवाराने उर्वरित १४ उमेदवारांचे ‘नॉमिनेशन फॉर्म’ अवैध जाहीर करण्याची मागणी करत याचिका दाखल केली.

Anil Desai
खासदार अनिल देसाई यांचा सत्कार

या याचिकेवर न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. अनिल देसाई यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत, ॲड. अंकित लोहिया, ॲड. रुबीन वकील, ॲड. हर्ष पांडे, ॲड. मनीष दोषी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने ८ ऑक्टोबरला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल मंगळवारी (ता.१५) न्यायालयाने जाहीर केला याचिकाकर्त्याने ‘नॉमिनेशन फॉर्म’मध्ये तांत्रिक चुका असल्याचे म्हणणे मांडले.

मात्र त्याला पुष्टी देणारी कुठलीही ठोस माहिती सादर केली नाही. ‘नॉमिनेशन फॉर्म’मधील तांत्रिक चुकांमुळे निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम झाला; हे दाखवून देणारे याचिकेत ठोस असे काहीच नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने भिंगारदिवे यांची याचिका फेटाळून लावली.

Anil Desai
Anil Desai : खासदार अनिल देसाई यांची गुन्हे शाखेकडून चौकशी; ५० कोटींची रक्कम ठाकरे गटाने हस्तांतरित केल्याचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.