राज्यात लशीची टंचाई; 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण थांबवणार

४५ पुढील वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी असा काढला मार्ग
COVAXIN
COVAXIN Google file photo
Updated on

मुंबई: सध्या कोव्हॅक्सीन लसींचा मोठा तुटवडा (covaxin shortage)निर्माण झाला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांना विनालस माघारी परतावे लागतेय. कालही मुंबईतील अनेक केंद्रांवर (Mumbai vaccination center) नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. केंद्राकडून राज्याला कोव्हॅक्सीन लसीचे फक्त ३५ हजार डोस मिळाले आहेत. प्रत्यक्षात कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठी ५.५० लाख नागरिक पात्र आहेत. (covaxin shortage will impact on 18 to 44 age group state govt took important decision)

COVAXIN
Coronavirus : ऑक्सिजन देणाऱ्या रोपांच्या मागणीत वाढ

कोव्हॅक्सीन लसीची कमतरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेले कोव्हॅक्सीन लसींचे सर्व डोस ४५ पुढील वयोगटासाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राकडून ३५ हजार डोस मिळालेत, तर राज्य सरकारने २.७५ लाख डोस खरेदी केलेत. या सर्व लसी ४५ पुढील वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.

COVAXIN
आता अनिल परबांचाही नंबर लागणार- किरीट सोमय्या

आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांना १८ ते ४४ वयोगटासाठीचे कोव्हॅक्सीन लसींचे डोस ४५ पुढील वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचे आदेश दिलेत. लसींची ही कमतरता लक्षात घेऊन, १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरणाचा वेग कमी करण्याविषयीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()