मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्रातील नागरिकांना केल्यात. यातील सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे आता घरातून बाहेर कुणीही औषधं किंवा धान्य घ्यायला जात असाल तर त्यांनी मास्क घालणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना आणि महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली.
सध्याचा काळ हा हा काळ विषाणूच्या गुणाकाराचा काळ असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. अशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला ३ महत्त्वाच्या सूचना दिल्यात.
क्रमांक १ :
घराबाहेर पडताना कायम मास्क वापरा. आपल्याकडे मास्क नसेल तर स्वच्छ रुमालाचा किंवा फडक्यांच्या घड्या घालून आपल्या चेहऱ्यावर बांधणं अत्यन्त गरजेचं आहे. मास्क टाकताना आपण सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे. कारण मास्क फेकल्यावर यातून कोरोना पसरण्याची भीती आहे. म्हणूनच वापरलेला मास्क सुरक्षित जागा पाहून फेकावा. योग्य जागा पाहून मास्क जाळून टाकणे आणि त्याची राख नीट फेकणे हा मास्क फेकण्याचा उत्तम पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
क्रमांक २ :
कुणालाही सर्दी खोकला तापाची लक्षणं असतील तर अशांनी फ्युएल क्लिनिक मध्येच जायला हवं. याबाबत माहिती प्रत्येकाला दिली जाईल असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत. सर्दी खोकला तापाची लक्षणं असणाऱ्यांना फिव्हर क्लिनिकमध्ये तपासलं जाईल आणि पुढे काय उपचार दिले जातील याबद्दल सांगण्यात येईल.
क्रमांक ३
मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अधिकृत मेडिकल कोर्सची पदवी आहे किंवा ज्यांनी अधिकृत ट्रेनिंग घेतलंय अशा सर्वांना कोरोना विरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्याचं आवाहन केलाय. मुख्यमंत्र्यांनी आर्मी किंवा डिफेन्समधील कोअर मेडिकल टीममध्ये असलेल्या मात्र आता निवृत्त असेलेल्या नागरिकांना देखील आरोग्य सेवेत हातभार लावण्याचं आवाहन केलंय. दरम्यान ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात अनुभव आहे किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांनीच यामध्ये सहभाग घ्यावा असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी covidyoddha@gmail.com या ई-मेलवर आपली माहिती पाठवायची आहे.
कोरोना विरुद्धच युद्ध आपण जिंकणारंच असा विश्वास मुख्यामंत्र्यांनी बोलून दाखवलाय. महाराष्ट्रात आपण चाचण्या वाढवणार आहे. रॅपिड टेस्टिंग बद्दल देखील महाराष्ट्रात विचार सुरु आहे. चाचण्या किंवा PPE किट्स यासारख्या सर्व गोष्ट आपण प्रमाणित करून घेतल्यानंतरच आपण वापरात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. "आपलं घर हे आपले गड किल्ले आहेत, घरात राहा सुरक्षित राहा", असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.