Covid 19 : ''कोरोना काळातील ४ हजार कोटींच्या खर्चाचा तपशील मुंबई पालिकेकडे उपलब्ध नाही''

Corona
Coronaesakal
Updated on

मुंबई : कोरोना साथीच्या काळातील चार हजार कोटींच्या खर्चाचा तपशील मुंबई महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. कोविड काळात खर्चाबाबत सादर केलेल्या अहवालाची प्रत माहिती अधिकारातून अनिल गलगली यांनी अर्जाद्वारे मागवली होती. चार विभागांकडे हा अर्ज पाठवण्यात आला; मात्र मागविलेल्या खर्चाची माहितीच उपलब्ध नसल्याचे गलगली यांनी सांगितले.

कोविड काळात चार हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा पालिका आयुक्तांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते गलगली यांनी पालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात केलेल्या चार हजार कोटींच्या खर्चाबाबतच्या अहवालाची प्रत मागितली होती.

Corona
World Cup Final: पनवती नंतर आता 'पापी'; ममता बॅनर्जींची नाव न घेता मोदींवर खोचक टीका

आयुक्त कार्यालयाने गलगली यांचा अर्ज उपप्रमुख लेखापाल (आरोग्य) यांच्याकडे पाठवला. उपप्रमुख लेखापालाने या अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्याकडे पाठवला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अर्ज प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्याकडे हस्तांतरित केला; तर लेखा अधिकारी यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा उपप्रमुख लेखापाल (आरोग्य) यांच्याकडे पाठवला, असे गलगली यांनी म्हटले आहे.

Corona
Rajasthan Election : सचिन पायलट यांच्याविषयी पंतप्रधानांची पुन्हा सहानुभूती; म्हणाले, एक गुर्जरांचा मुलगा...

एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी सुरू आहे; तर दुसरीकडे चार हजार कोटींचा हिशोब मिळत नाही, ही बाब गंभीर आहे. कोविड काळातील खर्चाची माहिती मुंबई महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.