शाब्बास महाराष्ट्र ! पाच कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, लवकरच जाणार घरी..

शाब्बास महाराष्ट्र ! पाच कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, लवकरच जाणार घरी..
Updated on

मुंबई - देशात आणि महाराष्ट्रात कोरोना पसरू नये म्हणून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जातायत. अशात कोरोनाच्याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी महाराष्ट्रातून येतेय. बातमी कोरोनाची जरी असली तरी ही बातमी दिलासादायक आहे. कोरोना बरा होऊ शकतो हेच या बातमीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 

आज सकाळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील ५ रुग्ण बरे झाल्याची माहिती दिलीये. लवकरचं या पाचही नागरिकांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र डिस्चार्ज दिल्या नंतरही या कोरोना बाधित पण बऱ्या झालेल्या रुग्णांना घरीच राहावं लागणार आहे. एकीकडे महाराष्ट्रात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. काल ४९ वर असलेला आकडा आज ५२ वर गेल्याची माहिती आता समोर आली आहे.

आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  : 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाबाधित आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. मुंबईमध्ये १  पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ असे हे रुग्ण वाढलेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील १० दिवस हे स्टेज २ मधून स्टेज ३ मध्ये जाणं टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातायत. 

सध्या महाराष्ट्रात सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांवर जे उपचार सुरु आहेत ते महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत सुरु असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीये. 

covid 19 five corona patients will soon go home says health minister rajesh tope 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()