वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य चिंतेत; पण टोपे म्हणतात...

राजेश टोपेंनी सध्याच्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
rajesh tope
rajesh toperajesh tope
Updated on

राज्यातली कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पाहून प्रशासनाने सगळे निर्बंध हटवले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. ओमायक्रॉन विषाणूचे नवे व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं राज्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (Covid-19 updates in Maharashtra Health Minister Rajesh Tope)

rajesh tope
देशातली कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

मुंबईतली रुग्णसंख्या (Covid-19 patients in Maharashtra) अचानकपणे वाढली आणि आकडा ५०० वर पोहोचला. त्यामुळे काळजी घेण्याची गरज राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. टोपे म्हणाले, "मुंबईत अचानक ५०० रुग्ण वाढले आहेत. क्लस्टर भाग असलेल्या ठाणे, पुणे, पालघरमधली रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आज ज्या ३०-४० हजार चाचण्या होतायत, त्या वाढवाव्या लागतील. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं, घाबरण्याचं आत्ता काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल."

संख्या वाढतेय तिथल्या लोकांनी प्रसार होऊ नये यासाठी मास्क वापरत काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही राजेश टोपेंनी केलं आहे. बीए ४ आणि बीए ५ हे ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रकार सध्या तरी फारसा धोकादायक नाही. पुढच्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत राहील, पण रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यू यांचं प्रमाण कमी असेल तर चिंतेचं कारण नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.