सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार लसीकरण
ठाणे: महापालिकेकडून तृतीयपंथीयांसाठी कोविडची विशेष लसीकरण मोहिम शनिवारी (१९ जून) राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेत समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. कोविड लसीकरणापासून तृतीयपंथीय वंचित राहू नयेत, यासाठी ठाण्याच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही मोहिम राबवली जाणार आहे. (COVID 19 vaccination drive for transgender community on June 19 in Thane)
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागवतीने समाजातील तृतीयपंथीसाठी पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ‘’विशेष लसीकरण मोहीम’’ राबविण्यात येत असून सर्व तृतीयपंथीनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले असल्याचे ट्वीट ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व तृतीयपंथीयांचे लसीकरण केले जाणार आहे. तसेच कोणतेही ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीयांचेही लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या सर्वच घटकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात मुंबई परिसरातील तृतीयपंथीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी तृतीयपंथीयांसाठी लसीकरण मोहिम राबवावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत ही मोहिम घेतली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.