राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडलं भीषण वास्तव
मुंबई: कोरोना (Coronavirus) परिस्थिती लक्षात घेता 'एक देश एक निती' हा कार्यक्रम ठरवण्याची गरज आहे. नुसत्या जाहिरातीच्या (Advertisements) माध्यमातून कोरोना संपणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदी यांना लगावला. "भाजप (BJP) आणि मित्रपक्षांची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश (UP) आणि बिहारमध्ये (Bihar) कोरोनाचा प्रसार प्रचंड वाढलाय. शव (Dead Bodies) हे दहन किंवा दफन केलं जात नाहीये. याऊलट मृतदेहांचे चक्क नदीमध्ये (River) अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे", असं भीषण वास्तव त्यांनी प्रसारमाध्यमांतून मांडले. (Covid Infected Dead Bodies are nowadays thrown in the river Sadly Says NCP Nawab Malik Insist PM Modi to make National Policy)
"केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाही हे आता स्पष्टच झालं आहे. याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टांनी वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत, ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने करावी लागत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय", असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
"भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च केले जात आहेत, तेवढे पैसे कोरोनावर खर्च केले असते, तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता. अजूनही वेळ गेलेली नाही. संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही, तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही" अशी भीतीही मलिक यांनी व्यक्त केली. तसेच, मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.