Khichadi Scam: खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण, अमोल किर्तीकर अडचणीत?; बँक खात्यांचा तपशील आला समोर

लाखो रुपये खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Khichadi Scam
Khichadi Scam
Updated on

मुंबई : कोविड काळातील कथीत खिचडी घोटाळ्याबाबत खळबळ उडवून देणारी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस सूरज चव्हाण आणि अमोल कर्तीकर यांची आज गुन्हे शाखेकडून चौकशी पार पडली. या चौकशीत दोघांच्या बँक खात्यांच्या तपशीलाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. (Khichadi Scam Suraj Chavan Amol Kirtikar in trouble details of bank accounts came front)

Khichadi Scam
Amruta Fadnavis on Ajit Pawar: अमृता फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाल्या, फडणवीसांचे भाऊ...

आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी झाली. दोघांच्या बँक खात्याची सध्या चौकशी सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांच्या माहितीनुसार, किर्तीकरांच्या खात्यात ५१ लाख रुपये तर चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Khichadi Scam
ShivSena MLA Desqualification: शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल यावर्षी लागणं कठीण; प्रक्रियेला का होतोय उशीर वाचा?

कोण आहेत सूरज चव्हाण, अमोर किर्तीकर?

सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तर अमोल किर्तीकर हे शिंदे गटासोबत असलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.