मुंबई : डायलिसिस करण्यापूर्वी कोविड-19 चा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे पालिका प्रशासनाने बंधनकारक केले आहे; मात्र त्यामुळे दर आठवड्याला डायलिसिस करणाऱ्या रुग्णांना प्रत्येक आठवड्याला कोविड 19 ची चाचणीसुद्धा करावी लागत आहे. त्यामुळे या रुग्णांची फरफट होत आहे.
ठाण्यात राहणाऱ्या 42 वर्षीय अस्मिता विचारे यांनी किडनीच्या आजार आहे. गेल्या 2 वर्षांपासून त्यांना डायलिसिस करावे लागते. जसलोक रुग्णालयात आठवड्यातून दोनदा त्या नियमित डायलिसिस करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जसलोक रुग्णालय प्रशासनाने नवीन रुग्णांसाठी ओपीडी बंद केली. डायलिसिसची सेवा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला; मात्र प्रत्येक चाचणीवेळी कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक केले आहे.
गेल्या आठवद्यात विचारे रुग्णालयात गेल्या असता त्यांना निगेटिव्ह अहवाल मागण्यात आला. त्यांच्याकडे तो नव्हता. त्यात जसलोक रुग्णालयात कोविडची चाचणी होत नसल्याने अस्मिता यांना मेट्रोपोलिस किंवा इतर एजन्सीजकडून चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर एका खासगी केंद्रामधून त्यांनी कोविडची चाचणी केली. त्यानंर तो अहवाल दाखवत त्यांनी आपले डायलिसिस करून घेतले. ही फरफट टाळण्यासाठी डायलिसिस रुग्णांना डायलिसिस सेंटरमध्येच कोरोना चाचणीची सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय प्रत्येकवेळी कोविड चाचणीसाठी इतर केंद्रांवर जाणे त्रासदायक ठरत असल्याचे अस्मिता यांचे म्हणणे आहे. दर आठवड्याला दोन वेळा डायलिसिस करून रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम झालेला असतो. त्याची रोग प्रतिकारशक्तीदेखील कमी झालेली असते. अशा परिस्थितीत डायलिसिसच्या रुग्णाला वारंवार कोरोनाची चाचणी करण्यास सांगितल्यास रुग्णाच्या आरोग्यावर अधिक परिणाम होण्याची भीती अस्मिता ह्यांची बहिण पूजा देसाई यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचाही धोका
कोविड चाचणीसाठी वारंवार केंद्रावर गेल्यास डायलिसिस रुग्णांना कोविड संसर्गाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय एक चाचणीसाठी साडे चार हजार रुपये खर्च असल्याने प्रत्येक आठवड्याला कोविडची चाचणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. डायलिसील रुग्णांची ही समस्या आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पालिका आयुक्तांकडे इमेल आणि ट्विटरच्या साहाय्याने पोहोचवली असून त्यांनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी पूजा देसाई यांनी केली आहे.
The Covid Negative Report No dialysis unless brought
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.