Covid Oxygen Plant Scam: आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार रोमिल छेडा विरुद्ध आरोपपत्र दाखल!

ऑक्सिजन प्लांट घोटाळा: 4000 पानांच्या आरोपपत्रात कंत्राटदार छेडावर गंभीर आरोप
Covid Oxygen Plant Scam
Covid Oxygen Plant Scamsakal
Updated on

Mumbai Covid Oxygen Plant Scam: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रोमिल छेडा विरुद्ध 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे, आरोपी रोमील छेडावर कोविड दरम्यान ऑक्सिजन प्लांट्सशी संबंधित कंत्राटांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी आणि मुंबई मनपाचे आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर छेडा यांना नोव्हेंबर 2023 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. छेडा हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असून छेडा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Covid Oxygen Plant Scam
Oxygen Plant : जीव गेल्यावर उभारणार का ऑक्सिजन प्लांट? निधी अभावी रखडले दोन प्रकल्प

कोविड काळात मुंबई मनपाकडून छेडा यांच्या कंपनीला मुंबईतील अनेक रुग्णालये आणि जंबो कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे कंत्राट दिले. रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत आरोपपत्रात मुंबई मनपाकडून कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप छेडावर करण्यात आलेला आहे.

रोमिन छेडा याचे संबंध शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा यांची चौकशी करण्यात आली होती.आर्थिक गुन्हे शाखेसोबत, अंमलबजावणी संचालनालयाने कोविड काळात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यात घोटाळ्यात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणीचा तपास केला आहे.

Covid Oxygen Plant Scam
Covid Scam: ऑक्सिजन घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ८ तासांच्या चौकशी नंतर एकाला केली अटक

मुंबईच्या 13 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचं कंत्राट दिलं. त्यासाठी 140 कोटी रुपये देण्यात आले. रोमिन छेडा याने पैसे घेतले आणि केवळ 38 कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच 102 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहेमुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात 30 दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते.

हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. कोणतेही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.

Covid Oxygen Plant Scam
Covid 19 BodyBag Scam: माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडीकडून तब्बल ६ तास चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.