मे महिन्यात मुंबईला फक्त ५ लाख २३ हजार ४४० लसींचा पुरवठा

मुंबईच्या लस पुरवठ्यात ४४ टक्क्याने घट
Vaccination
Vaccination esakal
Updated on

मुंबई: मुंबईला होणाऱ्या लस पुरवठ्यामध्ये (Covid vaccine supply) मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात लसींचा पुरवठा ४४ टक्क्याने कमी झाला आहे. एप्रिल आणि मार्चच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईत लसीकरणाचे (vaccination) प्रमाण कमी आहे. बीएमसीच्या डाटानुसार, मे महिन्यात ५ लाख २३ हजार ४४० लसींचा पुरवठा करण्यात आला. तेच एप्रिल महिन्यात ९ लाख ४७ हजार ५०० लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला होता. (Covid vaccine supply falls by 44% in Mumbai in May compared to April BMC data)

मुंबईला १६ जानेवारीपासून आतापर्यंत ३१ लाख १७ हजार ८९० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरणाचा शुभारंभ झाला होता. सुरुवातीला फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले होते. त्यानंतर कोरोना योद्ध्यांसाठी लसीकरण सुरु झालं. मार्चच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर ४५ वर्षावरील नागरिकांचा समावेश झाला. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटाचा सुद्धा लसीकरणामध्ये समावेश झाला.

Vaccination
अनलॉकच्या गोंधळानंतर विजय वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया

लसीकरणामध्ये नवीन वयोगटांचा समावेश होत असताना, पुरवठा कमी होत गेला. त्यामुळेच मे महिन्यात मुंबईत लसीकरणामध्ये घट झाली. जानेवारीमध्ये BMC ला २ लाख ६५ हजार लसींचे डोस मिळाले. त्यात ३३ हजार ५०५ नागरिकांचे लसीकरण झाले. फेब्रुवारी महिन्यात ५ लाख ७१ हजार डोस मिळाले. त्यात १ लाख ८७ हजार ८०५ नागरिकांचे लसीकरण झाले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

मार्चमध्ये ८ लाख १० हजार ९५० डोस प्राप्त झाले. त्यात ९ लाख ३१ हजार ६६४ नागरिकांचे लसीकरण झाले. एप्रिल महिन्यात ९ लाख ४७ हजार ५०० लसींचे डोस मिळाले. त्यात १२ लाख ७५ हजार ६५२ नागरिकांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ५ लाख २३ हजार ४४० डोस मिळाले. पण ८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()