Mumbai Crime : कल्याण टिटवाळा परिसरात गाईची तस्करी; पोलिसांनी 46 गोवंशाची गो-तस्करांकडून केली सुटका

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करांकडून गोवंशाची तस्करी सुरू
Cow smuggling Kalyan Titwala area Police rescued 46 cows from cow smugglers crime mumbai
Cow smuggling Kalyan Titwala area Police rescued 46 cows from cow smugglers crime mumbaisakal
Updated on

डोंबिवली : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करांकडून गोवंशाची तस्करी सुरू असल्याची बाब टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. टिटवाळा परिसरातील राये गावात निर्जन परिसरातील अनधिकृत व अर्धवट बांधलेल्या चाळी असून या चाळींच्या खोल्यात गायींना डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी डांबून ठेवलेल्या 46 गाईची सुटका करत गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील गोवंश तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. त्यात काही दिवसांपूर्वी शहापूर,मुरबाड,कल्याण तालुक्यातील अनेक गोवंश चोरी करून त्यांची तस्करी होत असल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गोवंश तस्करांविरोधी कठोर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची योजना आखली.

त्यानंतर पोलिसांनी शहापूर, कल्याण, मुरबाड, पडघा अशा विविध ठिकाणी धडक कारवाई करत गोवंश तस्करांचे धाबे आवळले आहेत. या कारवाई दरम्यानच टिटवाळा पोलिसांनी खडवली जवळ असलेल्या राये गावात मोठी कारवाई करत कत्तली साठी डांबून ठेवण्यात आलेल्या गाईंची गोवंश तस्करांकडून सुटका केली.

Cow smuggling Kalyan Titwala area Police rescued 46 cows from cow smugglers crime mumbai
Mumbai Rain Update : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा लुटला आनंद; तर नोकरी व कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांची उडाली तारांबळ

त्यात तब्बल 46 च्या आसपास गाय व बैलांचा समावेश असून हे सर्व गाई बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खडवलीतील राये गावात निर्जन परिसरातील अनधिकृत व अर्धवट बांधलेल्या अनेक चाळीच्या खोल्यात डांबून ठेऊन 28 तारखेला बकरी ईद च्या दरम्यान या सर्व गाईची कत्तल करू मोठ्या प्रमाणात यायचं मास महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .

Cow smuggling Kalyan Titwala area Police rescued 46 cows from cow smugglers crime mumbai
Mumbai Crime : पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी चढवण्याचा केला होता प्रयत्न; आरोपीला तब्बल 2 वर्षांनी ठोकल्या बेड्या

तर ही कारवाई मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे,मुरबाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे,कुळगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोई,कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व टिटवाळा पोलिस स्टेशनचे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजरंग दल च्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता पोलीस करत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.