मुंबई: क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. तर, वाहतुक पोलिस याप्रकरणी अहवाल तयार करत असून त्यात प्रादेशिक परिवहन विभागाला(आरटीओ) आरोपी समीर अली सय्यद ऊर्फ डिग्गी(45) याचा चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची विनंती करण्यात येणार आहे.
चालक समीरला फिट्स आल्यामुळे त्याचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जे.जे. रुग्णालयात त्याची 2 सप्टेंबरपासून मानसिक चाचणी करण्यात येत आहे. 7 सप्टेंबरपर्यंत ही चाचणी चालणार आहे. यापूर्वी 12 मेला आरोपीने जे.जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीतही अपघात केला होता. त्यात आरोपीने कारने दुस-या कारला धडक दिली होती. यात महिला जखमी झाली होती. दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरोपी कार चालवण्यास पात्र वाटत नसल्यामुळे परवाना रद्द करण्यासाठी विनंती पोलिस आरटीओकडे करणार आहे. त्यासाठी मानसिक चाचणी करण्यात येत आहे.
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.