Ravindra Chavan : विधानसभेपुर्वीचे प्रत्येक सण राजकीय स्वरूपात साजरे करून वातावरण निर्मिती करा

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सण राजकीय स्वरूपात साजरे करून वातावरण निर्मिती करा.
Ravindra Chavan
Ravindra Chavansakal
Updated on

उल्हासनगर - विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सण राजकीय स्वरूपात साजरे करून वातावरण निर्मिती करा असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही अवघ्या अडीच महिन्यावर आल्याने भाजप पक्ष जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षात 25 करोड भारतीयांना गरीबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी जाहीर केले. उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना 2019 मध्ये आपल्या बरोबर गद्दारी झाली. मात्र आता तसे होणार नाही.

त्यामुळे पुढची पाच वर्ष विधानसभेत आपली सत्ता राहणार असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी काँग्रेस पण निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबाला लक्ष्य करताना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनी कोणीही पुंगी म्हणजेच तुतारी घेऊन उभे रहा, जनता त्यांची पुंगी वाजविल्याशिवाय राहणार नाही. अश्या कडक शब्दात कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असू दे विजय मात्र भाजपचाच होईल असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीला मंत्री रविंद्रचव्हाण, आमदार कुमार आयलानी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी, विधानसभा अध्यक्ष जमनु पुरस्वानी, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्ता, इतर मागासवर्गीय विभागाचे प्रमुख प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी, लाल पंजाबी, मनोहर खेमचंदानी, राकेश पाठक, नरेश थारवानी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.